अरुणिता कांजीलाल नव्हे तर 'या' व्यक्तीच्या प्रेमात आहे पवनदीप राजन

पवनदीप हा मूळचा उत्तराखंडमधील चंपावत इथला आहे. 

Updated: Sep 25, 2021, 04:57 PM IST
अरुणिता कांजीलाल नव्हे तर 'या' व्यक्तीच्या प्रेमात आहे पवनदीप राजन

मुंबई : पवनदीप हा मूळचा उत्तराखंडमधील चंपावत इथला आहे. अगदी लहानपणापासूनच त्याला गायनाची आवड. पवनदीप हा 'इंडियन आयडॉल १२'मधला असा एकमेव स्पर्धक आहे. ज्याला गायनासोबतच जवळ-जवळ सगळी वाद्य वाजवता येतात. पवनदीपचे वडील सुरेश राजन आणि काका सतीश राजन यांनी लहानपणापासूनच त्याला संगीत शिकवलं.

२००५ मध्ये 'द वॉईस ऑफ इंडिया' हा शो जिंकल्यानंतर पवनदीपच्या करिअरला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. पवनदीपने काही मराठी चित्रपटांनाही संगीत दिग्दर्शनाचं काम केलं आहे. त्यांच्या काही चाहत्यांनी त्यांनी खऱ्या आयुष्यात एकत्र यावे अशी इच्छा देखील व्यक्त केली आहे. परंतु अरुणिता आणि पवनदीप एकमेकांना चांगले मित्र मानतात.

'इंडियन आयडल 12' पवनदीप राजनने जिंकला होता. तर अरुणिता कांजीलाल शोची पहिली उपविजेती होती. शो संपला आहे आणि पवनदीप-अरुणिता पुढील प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहेत.

पवनदिप आहे या अभिनेत्रीच्या प्रेमात
अरुणिता कांजीलाल आणि पवनदीप राजन यांनी त्यांच्या मैत्री आणि लिंक-अपच्या बातम्यांवर अनेक वेळा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

 शोदरम्यान देखील या दोघांच्या रिलेशनची चर्चा झाली.परंतु शोनंतर देखील अनेक ठिकाणी हे दोघेही एकत्र दिसले. ज्यामुळे सोशल मीडियावर देखील या दोघांच्या नात्याविषयी खूप चर्चा सुरू आहे. मात्र दिलेल्या एका मुलाखतीमध्ये पवनदिपने सांगितलं की, तो माधुरी दिक्षितचा खूप मोठा चाहता आहे. माधुरी दिक्षीतचा त्याची सगळ्यात आवडती अभिनेत्री आहे.