सर्वांना 'आशिकी' शिकवणाऱ्या अभिनेत्याची प्रेमात वाईट अवस्था, काय म्हणावं हे ?

पहिल्याच चित्रपटातून त्याने अनेकांच्या मनाचा ठाव घेतला. खऱ्या अर्थानं तरुणाईला आशिकीचा अर्थ त्यानं समजावला. 

Updated: Feb 9, 2022, 11:23 AM IST
सर्वांना 'आशिकी' शिकवणाऱ्या अभिनेत्याची प्रेमात वाईट अवस्था, काय म्हणावं हे ?  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : 'आशिकी' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला राहुल रॉय हा अभिनेता त्याच्या अनोख्या रुबाबासाठी आणि देखण्या रुपासाठी अतिशय लोकप्रिय झाला होताय 1990 मध्ये त्याच्या बॉलिवूड कारकिर्दीची सुरवात झाली. 

पहिल्याच चित्रपटातून त्याने अनेकांच्या मनाचा ठाव घेतला. खऱ्या अर्थानं तरुणाईला आशिकीचा अर्थ त्यानं समजावला. 

पण, प्रत्यक्ष आयुष्यात मात्र त्याला प्रेमानं साथ नाही दिली. आयुष्यभराच्या जोडीदाराच्या शोधात असणाऱ्या राहुलनं या वाटेवर मात्र निराशाच पाहिली. 

राहुल रिलेशनशिपमध्ये तर होता, पण त्याला कायमस्वरूपी साथ मिळालीच नाही. असं म्हटलं जातं की पूजा भट्ट हिच्यासोबत त्याचं नातं चांगल्या वळणावर आलं. दोघांनी स्क्रीनही शेअर केली. 

दोघांमध्ये जवळीक वाढली, भेटीगाठीही वाढल्या. पण, कामात व्यग्र असल्यामुळे या नात्याला त्यांना अपेक्षित वेळ देता आला नाही. 

मनिषा कोईरालाशीही त्याचं नाव जोडलं गेलं. पण, पुन्हा तेच. कामातच व्यग्र असल्यामुळे राहुल त्याच्या खासगी आयुष्याला मात्र वेळ देऊ शकला नाही. 

पुढे सुमन रंगनाथन हिच्यासोबत तो 3 वर्षे रिलेशनशिपमध्ये होता. सुमन त्याच्याच फ्लॅटमध्ये राहू लाहली. त्याच्या सांगण्यावरुन तिला कामही मिळू लागलं. 

पण, यावेळीही कामानंच त्यांच्या नात्याच मीठाचा खडा टाकला. तीनदा प्रेमात अपयशी ठरलेल्या राहुलनं राजलक्ष्मी खानविलकर हिच्याशी लग्न केलं. 

दोघांच्याही वयात 11 वर्षांचं अंतर होतं. राजलक्ष्मी करिअरच्या शोधात ऑस्ट्रेलियाला गेली. राहुलनंही तिथे यावं असं तिला वाटत होतं. पण असं झालं नाही. पुढे परस्पर सामंजस्याने त्यांनी घटस्फोट घेतला. 

यानंतर राहुलचं नाव साधना सिंह हिच्याशी जोडलं गेलं. साधना एक मॉडेल असल्याचं कळलं. राहुलनं प्रेमाच्या शोधात कायमच अपयशाचा सामना केला हेच त्याच्या आतापर्यंतच्या प्रवासातून पाहायला मिळालं. 

आशिकी' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला राहुल रॉय हा अभिनेता त्याच्या अनोख्या रुबाबासाठी आणि देखण्या रुपासाठी अतिशय लोकप्रिय झाला होताय 1990 मध्ये त्याच्या बॉलिवूड कारकिर्दीची सुरवात झाली. 