अखिल भारतीय नाट्य परिषदेकडून अशोक सराफ, रोहिणी हट्टंगडी यांना यंदाचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर

Ashok Saraf and Rohini Hattangadi Lifetime Achievement Award : अशोक सराफ आणि रोहिनी हट्टंगडी यांना मिळणार यंदाचा जीवनगौरव पुरस्कार   

दिक्षा पाटील | Updated: May 24, 2024, 11:29 AM IST
अखिल भारतीय नाट्य परिषदेकडून अशोक सराफ, रोहिणी हट्टंगडी यांना यंदाचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर title=
(Photo Credit : Social Media)

Ashok Saraf and Rohini Hattangadi Lifetime Achievement Award : दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षीही अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा गो.ब. देवल पुरस्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. हा पुरस्कार सोहळा १४ जून रोजी मुंबईत होणार आहे. तर यंदाच्या वर्षी हा पुरस्कार जेष्ठ सिने-नाट्य अभिनेते अशोक सराफ व अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना जाहिर करण्यात आला आहे. अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना त्यांच्या कामगिरीसाठी जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला. मागील तीन वर्षांपासून पुरस्कारांचे वितरण करण्यात आले नव्हते. नाट्य परिषदेची निवडणूक पार पडताच, कमी वेळात तातडीनं नवनिर्वाचित नियामक मंडळाने जीवनगौरव पुरस्कार  देण्याचे योजिले व पुरस्कार देण्यात आले. 

यंदाच्या वर्षी 14 जून 2024 रोजी हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. तर हा पुरस्कार सोहळा  यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल, मनमाला टॅक रोड, मांटुगा -माहीम, मुंबई येथे सायंकाळी ४ वाजता होईल. या संबंधीत माहिती ही नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी दिली आहे.

नाट्य क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या नाट्यकर्मींचा सन्मान नाट्य परिषदेच्या वतीनं दरवर्षी करण्यात येतो. यानिमित्तानं कलावंतांचा मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. तसेच 100 व्या नाट्यसंमेलनानिमित्त घेण्यात आलेला 'नाट्यकलेचा जागर' यातील सर्वोत्कृष्ट पारितोषिक प्राप्त एकांकिका, बालनाट्य, एकपात्री, नाट्यछटा, नाट्यसंगीत पद गायन, नाट्य अभिवाचन कार्यक्रम यानिमित्ताने सादर होणार आहेत. 

दरम्यान, यंदा कोणा कोणाला वरीव पुरस्कार मिळणार आहेत

  • लीला मेहता पुरस्कृत भार्गवराम पांगे कार्यकर्ता पुरस्कार : गणेश तळेकर (नाट्य चळवळीसाठी विनामूल्य कार्याबद्दल)
  • डॉ. न. अ. बरवे स्मृती पुरस्कार - प्रशांत जोशी
  • कमलाकर वैशंपायन स्मृती पुरस्कार - दीपाली घोंगे
  • कै. भालचंद्र त्र्यंबक जोशी स्मृती पुरस्कार - शशांक लिमये (उत्कृष्ट निवेदक)
  • बाळकृष्ण भोसले स्मृती पुरस्कार - विजय जगपात (गुणी रंगमंच कामगार)
  • वि.स. खांडेकर नाट्यसमीक्षा पुरस्कार - संजय देवधर (समीक्षा)
  • अ. सी. केळुस्कर स्मृती पुरस्कार - गोविंद गोडबोले (बालरंगभूमीवरील योगदान)
  • कै. विनय आपटे, कै. अविनाश फणसेकर आणि कै. भाई बोरकर स्मृती पुरस्कार - प्रायोगिक नाट्यसंस्था- अभिनय संस्था (कल्याण) - अभिजीत झुंझारराव
  • सर्वोत्कृष्ट नाट्य व्यवस्थापक - प्रणीत बोडके
  • नाट्य मंदार पुरस्कार - अशोक ढेरे
  • उत्कृष्ट लोककलावंत पुरस्कार - अशोक बेंडखळे
  • कामगार रंगभूमीवरील सर्वोत्कृष्ट लेखक पुरस्कार - श्याम आस्करकर
  • विशेष पुरस्कार - स्व: रितेश सांळुके (कार्यकर्ता पुरस्कार) 
  • सुनील बेंडखळे यांना लोककलावंत पुरस्कार

हेही वाचा : मोदी पुन्हा निवडूण येतील का? बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेत श्रेयस तळपदे म्हणाला, ' माझ्या मते ते...'

कलावंत व नाट्य रसिकांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन श्री. प्रशांत दामले यांनी केले आहे.