धक्कादायक... ड्रग्सच्या नशेत प्रसिद्ध अभिनेत्री बेफाम, 'या' कारणामुळे मित्रासोबत अटक

 ड्रग्स प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकलेली अभिनेत्री पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, 'या' कारणामुळे मित्रासोबत पोलिसांनी केली अटक    

Updated: Jul 29, 2022, 08:47 AM IST
धक्कादायक... ड्रग्सच्या नशेत प्रसिद्ध अभिनेत्री बेफाम, 'या' कारणामुळे मित्रासोबत अटक title=

मुंबई : गेल्या काही वर्षांमध्ये अनेक अभिनेत्री ड्रग्स प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकल्या. त्यामधील एक अभिनेत्री पुन्हा अंमली पदार्थाच्या सेवनामुळे आणि भरधाव वेगात कार ड्रइव्ह केल्यामुळे अडचणीत अडकली आहे. बेफान कार ड्राइव्ह केल्यामुळे अभिनेत्रीसह पोलिसांनी मित्राला देखील अटक केली आहे. प्रसिद्ध मल्याळम अभिनेत्री अश्वेथी बाबू  आणि  मित्र नौफल यांना अटक करण्यात आली आहे. 

अश्वेथी बाबू आणि मित्र दोघेही अंमली पदार्थाच्या नशेत गाडी चालवताना अढळून आल्यामुळे दोघांवर कारवाई करण्यात आली आहे. दोघांनी नशेत गाडी चालवल्यामुळे अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे अश्वेथी आणि नौफलवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, सिग्नल लागल्यामुळे प्रत्येकाने गाड्या थांबवल्या, पण नौफल गाडी न थांबवता त्याची गाडी ही पुढे मागे करत होता. त्यानंतर त्याने भरधाव वेगाने गाडी चालवत अनेक वाहनांना जोरदार धडक दिली. यामध्ये अनेक गाड्यांचे नुकसान झालं आहे. 

यावेळी एका स्थानिक व्यक्तीने त्या गाडीचा पाठलाग केला. दरम्यान गाडी चालवत असताना त्यांच्या गाडीचा टायर फुटला आणि दोघांनी त्याठिकाणाहून पळ काढला. त्यानंतर पोलिंसानी दोघांना पकडलं आणि कारवाई केली. 

याआधी देखील अश्वेथा ड्रग्स प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. 2018 मध्ये अभिनेत्रीला ड्रग्स प्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यावेळी तिच्या राहत्या घरात ड्रग्स पार्टीचे आयोजन करण्यात आल्याचं आढळल्यामुळे पोलिसांनी तिच्या फ्लॅटवर छापा टाकला होता.