वयाच्या 52 व्या वर्ष फिल्ममेकरचं दुसरं लग्न, त्याआधी या अभिनेत्री होत्या गर्लफ्रेन्ड

झगमगत्या दुनियेतील रंगीत आयुष्य, वयाच्या 52 व्या वर्षी दुसरं लग्न, त्याआधी अनेक अभिनेत्रींना केलय डेट 

Updated: Oct 8, 2021, 10:27 AM IST
वयाच्या 52 व्या वर्ष फिल्ममेकरचं दुसरं लग्न, त्याआधी या अभिनेत्री होत्या गर्लफ्रेन्ड title=

मुंबई :  बॉलिवूडमध्ये सर्वात जास्त चर्चेत असते ती म्हणजे कलाकारांची लव्ह लाईफ. प्रेमाला कोणत्याही प्रकारचं बंधन नसतं असं वारंवार झगमगत्या विश्वातून दिसून आलं आहे. आता देखील 52 वर्षांच्या फिल्ममेकरने 35 वर्षांच्या महिलेसोबत लग्न केलं आहे. फिल्ममेकर विक्रम भट्टने श्वेतांबरी सोनीसोबत लग्न केलं आहे. दोघांनी एक वर्षापूर्वी लग्न केल्याची माहिती समोर आली असून त्यांनी हे लग्न गुपित ठेवायचा निर्णय घेतला होता. विक्रम भट्टचं खासगी आयुष्य कायम चर्चेत राहिलं. दोन लग्नांपूर्वी त्याने बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींना डेट केलं आहे. 

विक्रम भट्टने अभिनेत्री सुष्मिता सेनला देखील डेट केलं होतं. पण त्यांचं नातं फार काळ काही टिकू शकलं नाही. त्यानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. सुष्मितानंतर विक्रमने अभिनेत्री अमीषा पटेलला देखील डेट केल. पण नंतर त्यांचं देखील ब्रेक अप झालं. आता विक्रमने दुसरं लग्न केलं. 

विक्रमचं पहिलं लग्न अदिती भट्टसोबत झालं. विक्रम आणि अदितीने एकमेकांना अनेक वर्ष डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी लग्न देखील केलं. दोघांना एक मुलगी देखील आहे. त्याच्या मुलीचं नाव कृष्णा आहे. सध्या विक्रम भट्ट त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. आता विक्रमने श्वेतांबरीसोबत लग्न केलं आहे. 

श्वेतांबरीबद्दल मोकळेपणाने बोलताना विक्रम म्हणाले की, त्यांना श्वेतांबरीबद्दल एक गोष्ट आवडते. आणि ती म्हणजे तिचा खरेपणा आहे. ती हुशार आहे. ती मनोरंजनाच्या जगाशी संबंधित नसल्यामुळे तिला भेटल्यावर खूप वेगळा अनुभव मिळतो. तिच्या घरी गेल्यावर एक वेगळाच अनुभव मिळतो.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x