Athiya Shetty And KL Rahul Get Married Soon: क्रिकेटपटू केएल राहुल आणि सुनिल शेट्टी यांची कन्या अथिया शेट्टी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. दोन आठवड्यांपूर्वी अथियाचे वडील सुनील शेट्टी यांनी या लग्नाबाबत खुलासा केला होता. केएल राहुलचं वेळापत्रक जुळत नसल्याने लग्न लांबणीवर पडल्याचं सुनिल शेट्टी यांनी सांगितलं होतं. आशिया कप, वर्ल्ड कप, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया दौरा आहे. जेव्हा दोघांना ब्रेक मिळेल. तेव्हा लग्नबंधनात अडकतील, असं सुनिल शेट्टी यांनी सांगितलं होतं. आता या दोघांच्या लग्नाचं ठिकाण ठरल्याचं समोर आलं आहे. पिंकव्हिलाला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांचं लग्न खंडाळ्यातील बंगल्यावर होणार आहे. लग्नाची व्यवस्था करण्यासाठी एक टीम खंडाळ्याला पोहोचली आहे.
केएल राहुल आणि अथिया यांचं लग्न यापूर्वी मुंबईतील 5 स्टार हॉटेलमध्ये होणार होते. पण त्यानंतर सुनिल शेट्टी यांच्या खंडाळ्यातील बंगल्यात लग्न होणार असल्याचं निश्चित झालं आहे. खंडाळ्यातील 'जहान' हा बंगल्याचं सुनील शेट्टी यांच्या मनात वेगळं स्थान आहे. सुनिल आणि माना शेट्टी यांनी हा बंगला 17 वर्षांपूर्वी बांधला होता. हा बंगाल प्रशस्त जागेवर बांधण्यात आला आहे.
लग्नसमारंभात सहभागी होणार्या जवळच्या लोकांनी सांगितले की, डिसेंबरच्या अखेरीस किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात या दोघांचं लग्न होईल. बॉलिवूड आणि क्रिकेटच्या जगताचं अथिया आणि केएल राहुलच्या लग्नाकडे लक्ष लागून आहे.