पतीच्या साखरपुड्यात सारा अली खानचा 'चकाचक' डान्स

सोशल मीडियावर साराच्या डान्सची चर्चा

Updated: Nov 29, 2021, 05:04 PM IST
पतीच्या साखरपुड्यात सारा अली खानचा 'चकाचक' डान्स

मुंबई : सारा अली खान, धनुष आणि अक्षय कुमार स्टारर अतरंगी रे सिनेमाचं पहिलं गाणं चकाचक रिलीज झालं आहे. श्रेया घोषालने आपल्या आवाजाच्या जादूने हे गाणं सजवलं आहे. तर दुसरीकडे सारा आणि धनुषची केमेस्ट्री फॅन्सला पसंतीस उतरत आहे. सगळ्यात गंमतीशीर बाब ही आहे की, गाण्यात सारा म्हणतेय की, आपल्या पतीच्या साखरपुड्यात दमदार डान्स करत आहे. फिल्मची स्टोरीला ज्या प्रकारे प्रेक्षकांसमोर ठेवलं जात आहे की, त्यांना ते खूप आवडत आहे. काही दिवसांपूर्वी  मेकर्सने 'अतरंगी रे'च्या पोस्टरमधून एक्टर्सचा फर्स्ट लूक रिलीज केला आहे. आता चकाचक गाण रिलीज झालं आहे.

गाण्याच्या सुरुवातीला सारा अली खान बोलताना दिसत आहे की, विस्सू बाबू, देशातली पहली पत्नी असेल ज्यात स्वत:च्याच नवऱ्याच्या साखरपुड्यात एवढी खूश आहे. इतकंच नाही तर त्यानंतर सारा एंगेजमेंटमध्ये जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. त्याचवेळी, चाहत्यांनी श्रेया घोषालचं कौतुक केलं आहे आणि सांगितलं आहे की, तिचा आवाज साराला खूप अनुकूल आहे. सारा अली खान पहिल्यांदाच धनुष आणि अक्षय कुमारसोबत दिसणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

एआर रहमानने चकचक हे गाणे संगीतबद्ध केलं आहे. इर्शाद कामिल यांनी या गाण्याला बोल दिले आहेत. सारा अली खान, धनुष आणि अक्षय कुमार यांचा आगामी चित्रपट अतरंगी रे बॉक्स ऑफिसवर टक्कर देणार नसून ओटीटीवर रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे स्ट्रीमिंग डिस्ने प्लस हॉटस्टारवर 24 डिसेंबर 2021 रोजी होईल. या चित्रपटात सारा अली खान रिंकू सूर्यवंशीच्या भूमिकेत दिसणार आहे. दुसरीकडे, धनुष विष्णूच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात अक्षय कुमार रिंग मास्टर आहे, ज्याचं नाव अनिल आहे.