या कारणासाठी सलमान खान पोहोचला गांधी आश्रमात !

 त्याचा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे

Updated: Nov 29, 2021, 04:55 PM IST
 या कारणासाठी सलमान खान पोहोचला गांधी आश्रमात !

अहमदाबाद, गुजरात : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान नेहमीच त्याच्या डेली लाईफमधील प्रत्येक गोष्टीमुळे चर्चेत असतो. सध्या तो अंतिम या त्याच्या सिनेमाचं प्रमोशन करण्यात व्यस्त आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी सलमान वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये आणि रिअ‍ॅलिटी शोमध्ये दिसला आहे.

नुकताच हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज झाला आहे.  त्यात आता अभिनेता सलमान खान गांधी आश्रम येथे गेल्याचं दिसून आलं. तेथे जाऊन त्याने चरखा देखील चालवला. 

अंतिम सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी तो गांधी आश्रमात पोहोचला होता. यावेळी तो उत्तम रित्या चरखा चालवताना दिसला . त्याचा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. यावेळी सलमान खानने जमिनीवर बसून चरखा चालवायला सुरुवात केली.

यासाठी अभिनेता सलमान खानच्या अंतिम सिनेमाच्या पोस्टरला चाहत्यांनी दुग्धाभिषेक केल्याचं समोर आलं होतं. मात्र चाहत्यांच्या या कृत्यामुळे सलमान खान भडकला...अन्नाची अशी नासाडी करू नका तर ते गरीबांना द्या असा सल्ला सलमानने आपल्या चाहत्यांना दिला आहे.