बॉयफ्रेंडला Kiss करत अनुराग कश्यपच्या लेकिकडून प्रेमाची ग्वाही; Video Viral

ही स्टारकिड तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे

Updated: Aug 24, 2021, 08:11 PM IST
बॉयफ्रेंडला Kiss करत अनुराग कश्यपच्या लेकिकडून प्रेमाची ग्वाही; Video Viral  title=
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

मुंबई : सोशल मीडियामुळं कलाकार आणि चाहत्यांमध्ये असणारी दरी कमालीच्या फरकानं कमी झाली. या माध्यमामुळे सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्यातही डोकावण्याची संधी चाहत्यांना मिळते. याचंच उदाहरण सध्या सोशल मीडियावरच पाहायला मिळत आहे. जिथं एक स्टारकिड तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. 

दिग्दर्शक अनुराग कश्यप (aaliyah kashyap ) याची मुलगी आलिया कश्यप ही तिच्या सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय आहे. आलियानं या वर्तुळात तिची वेगळी ओळख आणि फॉलोअर्स तयार केले आहेत. सध्या आलिया चर्चेत आहे ते म्हणजे एका खास पोस्टमुळं. ही पोस्ट खास असण्याचं कारण म्हणजे प्रियकराच्या वाढदिवसानिमित्तानं आलियानं Emotional पोस्ट लिहित त्याच्यासोबते फोटो  शेअर केले आहेत. 

इतकंच नव्हे, तर Shane Gregoire या आपल्या बॉयफ्रेंडला किस करतानाचा व्हिडीओही तिनं पोस्ट केला आहे. ज्या माध्यमातून तिनं शेनवरील प्रेमाची ग्वाहीच दिली आहे. 'तुला 22 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. तू मला कायमच नशीबवान असल्याची जाणीव करुन देतोस. तुझी भेट झाली, याबद्दल मी खरंच कृतज्ञ आहे. माझं तुझ्यावर कायम प्रेम असेल....', असं तिनं व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिलं. 

आलियानं बॉयफ्रेंडसाठी लिहिलेली पोस्ट आणि त्यासोबत शेअर केलेले फोटो पाहून सर्वांनीच यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. सेलिब्रिटी किड्सच्या यादीत आलियाची एंट्री काही वर्षांपूर्वी झाली. ज्यानंतर आता ती आपल्या वडिलांपेक्षाही जास्त चर्चेत असल्याचं पाहायला मिळतं.