दीपिका, प्रियंकापाठोपाठ बॉलिवूडमधील 'या' अभिनेत्रीचं लग्न ठरलं

कोण आहे ही अभिनेत्री 

दीपिका, प्रियंकापाठोपाठ बॉलिवूडमधील 'या' अभिनेत्रीचं लग्न ठरलं  title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये एका पाठोपाठ आता अभिनेत्रींच्या लग्नाची माहिती समोर येत आहे. ब्रूना अब्दुल्लाह, दीपिका पदुकोण आणि प्रियंका चोप्रा पाठोपाठ आता आणखी एक अभिनेत्री लग्नबंधनात अडकत आहे. फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर या अभिनेत्रीने साऊथमध्ये देखील काम केली असून लोकप्रियता मिळवली आहे. 

ही अभिनेत्री दुसरी, तिसरी कुणी नसून ही आहे बाहुबली फेम तमन्ना भाटीया. तमन्ना पुढच्या वर्षी अमेरिकेतील फिजिशिअनसोबत लग्न करणार आहे. ही गोष्ट तमन्नाची आई रजनी यांनी सांगितली आहे. त्यांनी सांगितलं की, तमन्नाचा नवरा तिच्याशी खूप लग्न करतो. तमन्ना भाटीयाच्या लग्नाची बातमी सगळ्या चाहत्यांना हैराण करणारी आहे. तमन्नाने या अगोदर एकदा ही आपल्या बॉयफ्रेंडबद्दल कुणालाही भनक लागू दिली नाही. ती कायम सांगत आली की, तिच्याकडे इतकं काम आहे की, रिलेशनशिपकरता तिच्याकडे वेळ नाही. अभिनेत्री म्हटलं की तिचं कोणत्या ना कोणत्या अभिनेत्यासोबत नाव जोडलं जातं. 

2012 मध्ये तमन्ना भाटिया आणि क्रिकेटर विराट कोहलीच्या अफेअरची देखील चर्चा होती. या दोघांची पहिली ओळख सेलेकॉनच्या जाहिरातीमध्ये झाली होती. यानंतर या दोघांना अनेक वेळा एकत्र पाहिलं आहे. असं म्हटलं जातं की, मॉडेल आणि अभिनेत्री इजाबेल हीची विराट कोहलीसोबत वाढलेली जवळीक बघता तमन्नाने ब्रेकअप केल्याच म्हटलं आहे. तमन्नाचं नाव पाकिस्तानी क्रिकेटर अब्दुल रज्जाकसोबत देखील जोडलं गेलं होतं. 

तमन्ना भाटियाच्या कामाबद्दल बोलायचं म्हटलं तर, सध्या तिच्याकडे अनेक ऑफर्स आहेत. तमन्नाकडे जवळ सिये रा नरसिंहा रेड्डी, खामोशी, कन्ने कलायमन्ने आणि कुणाल कोहलीचा एक सिनेमा देखील आहे. या सिनेमांमुळे ती पुढच्या सहा ते आठ महिन्यांत खूप बिझी आहे.