VIDEO : प्रभास- अनुष्काचा लग्नातील व्हिडिओ व्हायरल

त्यांच्या ऑनस्क्रिन केमिस्ट्रीप्रमाणेच ऑफस्क्रीन केमिस्ट्रीही बरीच गाजते. 

Updated: Jan 4, 2019, 12:09 PM IST
VIDEO : प्रभास- अनुष्काचा लग्नातील व्हिडिओ व्हायरल

मुंबई : 'बाहुबली' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला दाक्षिणात्य अभिनेता प्रभास आणि अभिनेत्री अनुष्का शेट्टी यांनी त्यांच्या नात्याविषयी नेहमीच बऱ्याच गोष्टी गुलदस्त्यात ठेवल्या असल्या तरीही सोशल मीडियाच्या माध्यमातून मात्र त्यांच्या नात्याविषयी नवी बाजू प्रत्येक वेळी सर्वांनाच पाहायला मिळते. सध्या ही चर्चा होतेय ते म्हणजे त्यांच्या एका व्हायरल व्हिडिओमुळे. तो व्हिडिओसुद्धा आहे एका लग्नसमारंभातील... 

'बाहुबली' या चित्रपटाचे दिग्दक्शक एस.एस.राजामौली यांच्या मुलाच्या म्हणजेच, एस.एस. कार्तिकेयच्या विवाहसोहळ्यातील हा व्हिडिओ. ज्यामध्ये प्रभास आणि अनुष्काची केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. आता ते म्हणतात तसं ही मैत्रीतली केमिस्ट्री आहे की आणखी काही, हे तेच जाणतात. पण, चाहत्यांमध्ये मात्र हा व्हिडिओ कमालीचा चर्चेत आहे.

राजामौली आणि 'बाहुबली'ची संपूर्ण स्टारकास्ट यांचा जणू एक घारोबाच झाला आहे, त्यामुळे या दिमाखदार विवाहसोहळ्यात प्रत्येक कलाकार हा कुटुंबातील सदस्याप्रमाणेच वागत होता, आपल्या परिने या सोहळ्यात योगदान देत होता. यातच अनेकांच्या नजरा खिळल्या त्या म्हणजे प्रभास आणि अनुष्कावर. 

काही दिवसांपूर्वीच 'कॉफी विथ करण' या कार्यक्रमातही प्रभासला अनुष्कासोबतच्या नात्याविषयी एक प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्याने आपण फक्त आणि फक्त खूप चांगले मित्र असल्याचं स्पष्ट केलं होतं. अनुष्काला आपण, जवळपास आठ वर्षांपासून ओळखत असून तिच्यासोबतच्या नात्यात सहाजिकत तितकी सहजता आहे, असंही तो म्हणाला. त्याने दिलेलं हे उत्तर आता चाहत्यांना कितपत पटलंय हे सांगणं कठीणच. पण, येत्या काळात खुद्द अनुष्का आणि प्रभास त्यांच्या खासगी आयुष्याविषयी कोणता महत्त्वाचा निर्णय घेणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.