तुला पाहते रे : ईशा-विक्रांतच्या लग्नाची शाही लग्नपत्रिका

या दिवशी होणार शाही सोहळा 

तुला पाहते रे : ईशा-विक्रांतच्या लग्नाची शाही लग्नपत्रिका

मुंबई : झी मराठीवरील प्रत्येक मालिका ही वेगळी असते. सध्या 'तुला पाहते रे' ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. जशी आता आपल्या आजूबाजूला लग्नसराई पाहायला मिळते अगदी त्याच पद्धतीने 'तुला पाहते रे' या मालिकेत लग्नाची गडबड पाहायला मिळत आहे. 

ईशा निमकर आणि विक्रांत सरंजामे यांच्या लग्नाला अखेर परवानगी मिळाली आहे. ईशा आणि विक्रांत यांनी अनेक अडथळे पार करून या लग्नाला आपल्या कुटुंबियांकडून परवानगी मिळाली आहे. हे लग्न 13 जानेवारी 2019 रोजी सायंकाळी 7 च्या सुमारास होणार आहे. या लग्नाची बोलणी झाली असून ईशाला सरंजामे कुटुंबियांनी सून म्हणून स्विकारलं असून तिला 'टिळा' लावण्याचा कार्यक्रम देखील पार पडला आहे.

 बॉलिवूडला लाजवेल असा सरंजामे यांच्या लग्नाचा प्लान आखण्यात आला होता. पण मराठमोळ्या लग्न विधींकरता विक्रांत सरंजामे यांनी महाराष्ट्रातील भोर या ठिकाणची निवड लग्नासाठी केली आहे. लग्नाची गडबड सुरू असतानाच समोर ईशा आणि विक्रांत यांच्या शाही लग्नाची शाही पत्रिका समोर आली आहे. निमकरांनी आपल्या कुवतीप्रमाणे 160 रुपयांची पत्रिका निवडली होती पण सरंजामे कुटुंबाची ही पत्रिका पाहून तुमचे देखील डोळे दिपून जातील. 

काय आहे या पत्रिकेचं वेगळेपण 

अगदी शाही पत्रिकेचा बॉक्सच आपल्यासमोर येतो. या बॉक्समध्ये लग्न आणि त्या अगोदरच्या सर्व विधींची माहिती दिलेली आहे. या लग्नपत्रिकेत गणपतीची सुंदर मुर्ती देखील आहे. बॉलिवूडप्रमाणे ईशा-विक्रांत यांच्या लग्नाकरता खास #vikisha असा हॅशटॅग तयार करण्यात आला आहे. त्यानंतर पुढील कार्यक्रम पत्रिका आहेत. 

जसं की 11 जानेवारी 2019 रोजी रात्री 8.30 वाजता मेहंदीचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर 12 जानेवारी 2019 रोजी, रात्री 8.30 वाजता साखरपुडा होणार आहे. आणि लग्न 13 जानेवारी 2019 रोजी, 7 च्या मुहुर्तावर होणार आहेत. सॅपरॉनस्टे सिनर्जी हॉलिडे व्हिलेज, भोर याठिकाणी हे सर्व कार्यक्रम होणार आहेत.