बाहुबली कटप्पा मादाम तुसामध्येही झळकणार

लंडनच्या मादाम तुसामध्ये पुतळ्याच्या रूपात झळकणारे सत्यराज हे पहिलेच तामिळी अभिनेते असणार आहेत. 

Annaso Chavare Updated: Mar 13, 2018, 08:51 PM IST
बाहुबली कटप्पा मादाम तुसामध्येही झळकणार  title=

नवी दिल्ली : एस.एस. राजमौलीचा बहुचर्चीत आणि तिताकच लोकप्रिय ठरलेला चित्रपट म्हणजे बाहुबली: द कनक्लूजन. २०१५मध्ये आलेल्या या चित्रपटाने केवळ प्रभासलाच सुपरस्टार केले नाही. तर, सोबतच त्या चित्रपटातील जवळपास सर्वच पात्रांना जबरदस्त लोकप्रियता मिळवून दिली. यात, बाहुबलीनंतर सर्वात जास्त भाव जर कोणी खाल्ला असेल तर, कटप्पाने. याच कटप्पाचा आवाज लंडनमध्येही पोहोचला आहे. कटप्पाच्या या कामगिरीपुढे सुपरस्टार रजनीकांत आणि बाहुबलीही काहीसे फिके पडले आहेत.

हा मान मिळालेले पहिलेच तमिळी अभिनेते

बाहुबली चित्रपटात प्रामाणीक आणि शौर्यवान सेवक म्हणून निभावलेली अभिनेता सत्यराज यांच्या कटप्पाच्या भूमिकेची जोरदार चर्चा झाली. या कामगिरीबद्दल सत्यराज यांना लंडनमध्येही सन्मानित केले जाणार आहे.  प्रसारमाध्यमांतून आलेल्या माहितीनुसार, सत्यराजचा पुतळा मादाम तुसाच्या संग्रहालयातही उभारला जाणार आहे. या संग्रहालयात सत्यराज कटप्पाच्या अवतारात दिसणार आहेत. लंडनच्या मादाम तुसामध्ये पुतळ्याच्या रूपात झळकणारे सत्यराज हे पहिलेच तामिळी अभिनेते असणार आहेत. तर, प्रभास हे साऊथ इंडस्ट्रतील असे पहिले अभिनेते ठरले आहेत. ज्यांचा पुतळा लंडनच्या मादाम तुसामध्ये उभारण्यात आला आहे.

दिग्गजांनाही नाही मिलाला बहुमान

विशेष असे की, तमिळी किंवा साऊथ इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेते रजनीकांत, कमल हसन यांसारख्या कोणत्याच अभिनेत्याचा पुतळा मादाम तुसात झळकला नाही. मादाम तुसात पुतळा उभारला जाणार असल्याची बातमी ऐकून सत्यराज यांचे कुटुंबिया फार आनंदी झाले आहेत. त्यांच्या मुलाने ट्विटरवर म्हटले आहे की, वडिलांच्या कामगिचा मला अभिमान आहे.