Baby John Box Office Collection Day 4: वरुण धवनचा 'बेबी जॉन' हा चित्रपट ख्रिसमसच्या मुहूर्तावर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा चित्रपट प्रदर्शित होताच निर्माते आणि चित्रपटाशी संबंधित इतर लोकांना आशा होती की हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ करेल. पण असं होताना दिसत नाहीये. 'बेबी जॉन' चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसच्या अहवालात असे कोणतेही चित्र दिसत नाही.
'बेबी जॉन' चित्रपट प्रदर्शित होऊन 4 दिवस झाले आहेत. या चित्रपटाने पहिल्या दिवशी चांगली कमाई केली. परंतु, त्यानंतर या चित्रपटाची पुढील दिवसांची कमाई समाधानकारक दिसत नाहीये. चित्रपटाच्या चौथ्या दिवसाच्या कमाईशी संबंधित काही आकडे देखील सैक्निल्कवर उघड झाले आहेत. आतापर्यंत या चित्रपटाने किती कमाई केली? जाणून घ्या सविस्तर
'बेबी जॉन' चित्रपट बॉक्स ऑफिस कलेक्शन
बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि कीर्ति सुरेश यांचा 'बेबी जॉन' हा चित्रपट 25 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर 11. 25 कोटींची कमाई केली. पण या चित्रपटाने दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर केवळ 4.75 आणि 3.65 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
दरम्यान, 'बेबी जॉन' चित्रपट प्रदर्शित होऊन तीन दिवस झाले आहेत. आज चौथा दिवस आहे. आज सकाळी 10:10 वाजेपर्यंत या चित्रपटाने 4.25 कोटी रुपयांची कमाई केली असून चित्रपटाचे आतापर्यंतचे एकूण कलेक्शन 23.90 कोटींवर पोहोचले आहे. सैक्निल्कवर उपलब्ध असलेले हे आकडे अंतिम नाहीत. यामध्ये बदल देखील होऊ शकतात.
विकेंडचा 'पुष्पा 2' आणि 'मुफासा'ला फायदा
अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' चित्रपटाने 24 व्या दिवशी 'बेबी जॉन' चित्रपटाच्या 3 पट अधिक कमाई केली आहे. तसेच हॉलिवूड चित्रपट 'मुफासा'ने देखील वरुण धवनच्या चित्रपटापेक्षा 3 पट अधिक कमाई केली आहे. 'बेबी जॉन' चित्रपटाला विकेंडचा फायदा होताना दिसत नाहीये. सुटीचा संपूर्ण फायदा 'मुफासा' आणि 'पुष्पा 2' ला होणार असल्याचे दिसत आहे.