हनी सिंग भारतीय महिलांना का डेट करत नाही? कारण खूपच धक्कादायक

Honey Singh : हनी सिंगनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Dec 29, 2024, 12:22 PM IST
हनी सिंग भारतीय महिलांना का डेट करत नाही? कारण खूपच धक्कादायक title=
(Photo Credit : Social Media)

Honey Singh : लोकप्रिय गायक, रॅपर आणि निर्माता हनी सिंग हा गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या डॉक्टू सीरिजमुळे चर्चेत आहे. त्याच्या या डॉक्यू सीरिजचं नाव 'यो यो हनी सिंग : फेमस 'असं आहे. हनी सिंग विषयी बोलायचं झालं तर 2003 मध्ये त्यानं हिप-हॉप म्यूजिक निर्माता म्हणून करिअरची सुरुवात केली. त्यानं नोव्हेंबर 2011 मध्ये त्याचा पहिला एल्बम, इंटरनॅशनल विलेगर प्रदर्शित केला होता. त्यानंतर त्यानं सगळ्यांच्या मनात जी जागा केली ती आजही कोणी घेऊ शकलेलं नाही. त्याचे फक्त भारतात नाही तर परदेशातही लाखो चाहते आहेत. 

नेटफ्लिक्सवर असलेली ही डॉक्यूमेंट्री 'यो यो हनी सिंह: फेमस' प्रदर्शित झाल्यानंतर हनी सिंग चर्चेत आली आहे. या डॉक्यू सीरिजमध्ये हनी सिंगनं त्याच्या आयुष्यातील रॉ आणि अनफिल्टर्ड साइडचा खुलासा केला आहे. या सीरिजमध्ये त्यानं त्याचे आधीचे रिलेशनशिप्स, त्याची एक्स पत्नी शालिनी तलवारसोबत त्याचं लग्न, मानसिक आरोग्यावर कसा परिणाम झाला आणि मानसिक संघर्षाविषयी मोकळेपणानं सांगितलं आहे. आता नेटफ्लिक्स इंडियाच्या ऑफिशियन यूट्यूब चॅनवरल त्याचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्यात हनी सिंग हा तन्मय भट्ट, रोहन जोशी आणि कुल्लू उर्फ आदित्य कुलश्रेष्ठ यांच्याशी बोलताना दिसत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

या सगळ्या चर्चांदरम्यान, जेव्हा हनी सिंगला विचारण्यात आलं की 'एक लोकप्रिय सेलिब्रिटी असल्यामुळे डेट करणं कठीण होतं का?' त्यावर हनी देओल म्हणाला, "हो, हे सगळं त्यावर अवलंबून असतं की तुम्हाला कोण आवडतंय आणि त्याचं तुमच्यावर प्रेम व्हाव यासाठी प्रयत्न करतायत. एक भारतीय सेलिब्रिटी असल्यामुळे हे करणं खूप कठीण होतं. त्यामुळे एका भारतीय महिलेला तो डेट करु शकत नाही कारण ती आधीच तुम्हाला एका प्रकारच्या पद्धतीनं ओळखतात. तुम्ही कुठेही जातात तिथे क्रू तुमच्यासोबत राहतं. त्यामुळे तुम्हाला हे देखील कळत नाही की खरंच ती तुमच्यावर प्रेम करते का? की फक्त लग्झरी लाइफ जगतात ते तिला आवडतंय."

हेही वाचा : 'Period Cramps फक्त मुंबई- दिल्लीच्या मुलींना येतात, इतरांना...'; गोविंदाच्या लेकीचं वादग्रस्त वक्तव्य

दरम्यान, यावेळी चर्चा करत असताना हनी सिंगनं खुलासा केला की "त्याला अशा ठिकाणी रिलेशनशिपसाठी कोणाला शोधायला आवडतं, जिथे त्या मुलीला माहित नसेल की तो कोण आहे? त्याविषयी सांगत हनी सिंग म्हणाला, मला डेटवर जायला आवडतं, पण अशा ठिकाणी जिथे मला कोणी ओळखत नाही. महत्त्वाचं म्हणजे अनेकदा मी हे केलंय आणि त्यात यशस्वी देखील झालोय. अनेक महिन्यांनंतर मी त्यांना सांगतो की मी कोण आहे? हे त्यासाठी की माझं एक सीक्रेट नाव आहे, एक्सपर्ट तर (हनी सिंगचा पर्सनल असिस्टंट शुभम गुप्ता) माझ्यासोबत असेल आणि मला विचारेल की सर, बोर्डिंग पास आणि तिकिट खरं कोणत्या महिलेच्या नावावर करायची आहेत. जेव्हा ती महिला डेस्टिनेशनवर जाणार, तर ती परच येईल? की त्याजागी कोणी दुसरं येईल."