'बधाई हो' सिनेमातील अभिनेत्रीला ब्रेन स्ट्रोक, आयसीयूत दाखल

'बालिका वधू' मालिकेतील कडक शिस्तीची दादी

Updated: Sep 9, 2020, 10:13 AM IST
'बधाई हो' सिनेमातील अभिनेत्रीला ब्रेन स्ट्रोक, आयसीयूत दाखल

मुंबई : प्रख्यात अभिनेत्री सुरेखा सिकरी यांना‌ ब्रेन स्ट्रोक झाला आहे. मंगळवारी त्यांच्या राहत्या घरी ही घटना घडली आहे. घरी ज्यूस पिताना हा स्ट्रोक आल्याची माहिती मिळाली आहे. सुरेखा सिकरी यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

सुरेखा सिकरी यांना या आधीही २०१८ मध्ये असा स्ट्रोक आला होता. त्यावेळी उपचार घेऊन त्या त्यातून बाहेर ही पडल्या होत्या. आता सुरेखा यांची आर्थिक तंगी असल्यामुळे त्यांनी जवळच्या रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला. घरी त्यांच्यासोबत असलेल्या नर्सने त्यांना रुग्णालयात दाखल केलं आहे. 

'बधाई हो' सिनेमाच्या रिलीजनंतर त्यांला असाच ब्रेन स्ट्रोक झाला होता. त्यावेळी त्यांना लकवा मारला होता. तेव्हापासून त्यांच्यासोबत कायमस्वरुपी एक नर्स असायची याच नर्सने त्यांना आता रुग्णालयात दाखल केलं आहे. 

नर्सने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास ज्यूस पिताना त्यांना ब्रेन स्ट्रोक झाला. त्यांना नजदीकच्या क्रिटीकेअर रुग्णालयात दाखल केलं आहे. 

 'बधाई हो', 'झुबेदा', 'तमस' हे सुरेखा सिकरी यांचे गाजलेले चित्रपट. सुरेखा सिकरी या ३ राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या आहेत. त्यांची 'बालिका वधू' ही मालिका प्रचंड गाजली होती. या मालिकेत त्यांनी साकारलेली 'दादी"ची भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.