येथे 'बाहूबली 2' पहा कोणत्याही ब्रेक शिवाय !

नेट फ्लिक्सवर पाहता येणार ' बाहूबली 2' 

Updated: Aug 10, 2017, 05:40 PM IST
येथे 'बाहूबली 2' पहा कोणत्याही ब्रेक शिवाय !  title=
मुंबई :  'बाहूबली 2' या चित्रपटाने देशा-परदेशात यंदा अनेक विक्रम केले. पण तुम्ही अजूनही ' बाहूबली 2' बघितला नसल्यास आता इंटरनेटवर तो ब्रेक शिवाय पाहता येणार आहे.
याकरिता दिग्दर्शक एस. एस. राजमौली आणि नेटफिक्समध्ये  25.5 करोड रूपयांचा करार झाला आहे.  
 
बिग बजेट असलेली बाहूबली यंदाची नंबर वन फिल्म ठरली आहे. या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर सुमारे 1500 करोडचा बिजनेस केला आहे.  आणि अजूनही हा चित्रपट दिवसागणिक कमाई वाढवत आहे.  
 
 
आज जगभरात रसिकांच्या तोंडावर ' बाहूबली 2' चं नावं आहे. या चित्रपटातील बाहूबली, भल्लालदेव, देवसेना, शिवगामी  या व्यक्तिरेखा रसिकांच्या खास लक्षात राहिल्या. 
 
नेट फ्लिक्स काय आहे ? 
 
नेट फ्लिक्स ही जगभरातील सगळ्यात मोठी इंटरनेट टेलिव्हीजन कंपनी आहे. जगभरातील 190 देशांमध्ये नियमित 12 करोड पेक्षा जास्त तास लोक नेट फ्लिक्सवर टिव्ही शो किंवा चित्रपट पाहतात. यामध्ये अनेक प्रकारच्या फिल्म्स , डॉक्युमेंट्री यांचा समावेश करण्यात आला आहे.नेट फ्लिक्सचं सबस्क्रिब्शन घेण्यासाठी वर्षाला 500  ते 1000 रूपये द्यावे लागतात.  या सुविधेचं एक प्रमुख आकर्षण म्हणजे तुम्हांला येथे कार्यक्रमादरम्यान कोणताही कमर्शियल ब्रेक पहायला मिळत नाही.