Abhishek Bachchan and Model Janhvi Kapoor : बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांची जोडी लोकप्रिय आणि हॉट कपलपैकी एक आहे. ते दोघं एकमेकांना ज्या प्रकारे सन्मान देतात त्यासाठी त्यांना सगळे लोक ओळखतात. जेव्हा ते दोघं कोणत्या कार्यक्रमात एकत्र हजेरी लावतात तेव्हा त्यांना पाहून सगळ्यांना आनंद होतो. ऐश्वर्या ही अभिषेकपेक्षा वयानं दोन वर्षानं मोठी आहे. त्यांनी 2007 साली सप्तपदी घेतल्या. त्यांच्या लग्नाच्या आजही चर्चा सुरु असतात. पण त्यांच्या लग्नाच्या वेळी एक अशी घटना झाली होती, ज्यानं सगळ्यांना धक्काबसला होता. त्यावेळी अभिषेकचं आधीच लग्न झालं आहे.
अभिषेक आणि ऐश्वर्यानं 20 एप्रिल 2007 रोजी लग्न केलं. त्याच दिवशी मॉडेल जान्हवी कपूर (श्रीदेवी आणि बोनी कपूरची लेक जान्हवी कपूर नाही) बच्चन कुटुंबाच्या प्रतिक्षा घरासमोर आली आणि अभिषेकचं तिचं लग्न झालं आहे असं म्हणू लागली. खरंतर जान्हवी ही अभिषेकच्या दस या चित्रपटात होती. तर त्यानंतर ते दोघं जवळ आले होते असे तिनं सांगितल. तर याशिवाय अभिषेक तिला लग्न करत धोखा देत असल्याचं तिनं सांगितलं. त्याचं लग्न होताच जान्हवीनं जुहू पोलीस स्टेशनमध्ये अभिषेक विरोधात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला होता. पण कोणताही पुरावा नसल्यानं त्यांनी तक्रार दाखल केली नाही.
जान्हवी कपूरचं म्हणणं होतं की दस या चित्रपटात एक काम केल्यानंतर आता अभिषेकनं तिला धोका दिला आहे. तर जान्हवीनं हे पब्लिसिटी स्टंट करण्यासाठी केल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. पण जेव्हा जान्हवीला कपूरला कळलं की अभिषेकनं सगळे आरोप फेटाळले आहेत. तेव्हा तिनं स्वत: चा हाताची नस कापत आत्महच्या करण्याचा प्रयत्न केला होता.
हेही वाचा : लेकीच्या बिकीनी सीनवर काय होती Hema Malini मालिनी यांची पहिली प्रतिक्रिया? पाहून तुम्हालाही भरेल धडकी
जान्हवीनं असं करतात तिला जवळच्या रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. त्यावेळी देखील जान्हवी ऐश्वर्यावर तिचा कथित असलेला पती अभिषेकला हिसकावून घेतल्याचा आरोप करत राहिली. त्यानंतर जुहू पोलीस स्टेशनमध्ये मॉडेलवर भारतीय दंड संहितेच्या कलम 309 अंतर्गत आत्महत्येच्या प्रयत्नाचा आरोप लावला. याशिवाय तिच्यावर 10 हजार रुपयांचा दंड वसूस केल्यानंतर तिची सुटका करण्यात आली होती. त्यानंतर मग ऐश्वर्या आणि अभिषेकचं लग्न झालं. यावेळी अभिषेक आणि ऐश्वर्याच्या लग्नासोबत जान्हवीची देखील चर्चा सुरु होती. दरम्यान, त्यांच्या लग्नानंतर जान्हवी बच्चन कुटुंबाच्या घराच्या आसपासही दिसली नाही. इतकंच काय तर ती त्यावर कधी काही बोलली सुद्धा नाही, असं म्हटलं जातं. पण या सगळ्यात किती तथ्य आहे हे कोणाला माहित नाही.