सिद्धार्थ-जॅकलिनच्या सिनेमाचं झक्कास ‘बंदूक मेरी लैला’ गाणं

सिद्धार्थ मल्होत्रा आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्या आगामी ‘अ जेंटलमन’ या सिनेमातील ‘बंदूक मेरी लैला’ हे गाणं रिलीज करण्यात आलं आहे. अ‍ॅश किंग, जिगर सरैया आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी मिळून गायलं आहे.

Updated: Aug 16, 2017, 03:39 PM IST
सिद्धार्थ-जॅकलिनच्या सिनेमाचं झक्कास ‘बंदूक मेरी लैला’ गाणं title=

मुंबई : सिद्धार्थ मल्होत्रा आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्या आगामी ‘अ जेंटलमन’ या सिनेमातील ‘बंदूक मेरी लैला’ हे गाणं रिलीज करण्यात आलं आहे. अ‍ॅश किंग, जिगर सरैया आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी मिळून गायलं आहे.

या गाण्यात अ‍ॅक्शनसोबतच या दोघांमधील रोमान्सही बघायला मिळत आहे. 

सिद्धार्थ मल्होत्रा आणि जॅकलिनचा हा पहिलाच एकत्र सिनेमा असून या दोघांमध्ये अफलातून केमिस्ट्री बघायला मिळत आहे. याआधी या सिनेमाच्या ट्रेलरला जोरदार प्रतिसाद मिळाला. या सिनेमाला सचिन-जिगर यांनी संगीत दिलंय. येत्या २५ ऑगस्टला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.