'मला मामी हाक मारल्यावर...', अमृता फडणवीस स्पष्टच बोलल्या

शोचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Updated: Aug 3, 2022, 08:00 PM IST
'मला मामी हाक मारल्यावर...', अमृता फडणवीस स्पष्टच बोलल्या title=

मुंबई : ‘झी मराठी’वर नुकताच ‘बस बाई बस’ हा कार्यक्रम सुरु झाला आहे. या कार्यक्रमाची सध्या सगळीकडेच चर्चा सुरु आहे. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे करत आहे. या कार्यक्रमाची थीम महिलांवर आधारित आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवलेल्या महिला या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. नुकताच या कार्यक्रमाचा प्रोमो समोर आला आहे. यावेळी कार्यक्रमात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी हजेरी लावली. अमृता यांनी या भागात बऱ्याच गोष्टी शेअर केल्याचं प्रोमोमध्ये पाहायला मिळालं आहे. 

अमृता नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असतात. त्यांना गाण्याची आवड असून त्यांचं नवं गाणं नुकतंच भेटीला आलं आहे. अमृता यांच्या बऱ्याच वक्तव्यांनी सुद्धा त्यांना प्रकाशझोतात आणलं आहे. एकंदरच कार्यक्रमाचा प्रोमो बघून एपिसोड धमाल आणि रंजक असणार असा संकेत मिळत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या भागात अमृता फडणवीस एका खास गोष्टीचा खुलासा करताना दिसणार आहे. अमृता यांची अजून एक ओळख म्हणजे मामी. देवेंद्र यांना ‘माजी मुख्यमंत्री’ म्हणजे मामु असं म्हटलं जातं तर त्यामुळे अमृता यांना मामी अशी ओळख मिळाली आहे. या प्रोमोमध्ये अमृता यांना एक महिला त्यांच्या या ओळखीबद्दल विचारले तेव्हा उत्तर देत त्या म्हणाल्या, 'मला तर मामी म्हणून बोलतात ते फारच आवडतं. मला फारच मजा येते.'

तसंच या प्रोमोमध्ये देवेंद्र आणि अमृता यांच्यातला एक खट्याळ संवाद सुद्धा बघायला मिळणार आहे. देवेंद्र यांच्या फोटोशी संवाद साधताना त्या म्हणतात, 'अरे वा! आज वेळ मिळाला वाटतं. कुठे नेताय फिरायला? आसाम ला?' मागच्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात झालेल्या उलथापालथीमध्ये आसाम, गुवाहाटी, सुरत अशी अनेक शहरं जोडली गेली होती. त्याचा संदर्भ लावत अमृता जबरदस्त उत्तर देताना दिसत आहेत.

अमृता या सोशल मीडियावर देखील बऱ्याच सक्रिय आहेत. त्या अनेक कार्यक्रमांना उपस्थिती लावताना दिसून येतात. तर त्यांच्यासोबत गप्पा मारतानाचा हा एपिसोड चांगलाच रंगल्याच पाहायला मिळणार आहे.