Bday : स्मिता पाटील यांचा बिग बींना रात्री 2 वाजता फोन, कारण....

अमिताभ बच्चन यांनी पुस्तकात केला खुलासा 

Updated: Oct 17, 2019, 09:30 AM IST
Bday : स्मिता पाटील यांचा बिग बींना रात्री 2 वाजता फोन, कारण....  title=

मुंबई : स्मिता पाटील या अशा अभिनेत्री आहेत ज्यांचा कलाविश्वातील काळ अतिशय कमी राहिला आहे. पण या कमी वेळात त्यांनी स्वतःची एक वेगळीच जागा निर्माण केली. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत आजही स्मिता पाटील यांचे असंख्य चाहते आहेत. प्रत्येक अभिनेत्रीसाठी स्मिता पाटील या एक आदर्श आहेत. 

1975 साली स्मिता पाटील यांनी 'चरणदास चोर' या सिनेमातून आपल्या करिअरला सुरूवात केली. खऱ्या आयुष्यात अतिशय शांत असलेली स्मिता पाटील यांनी सिनेमात बोल्ड सीन म्हणून देताना अतिशय बिन्धास्त असायच्या. 17 ऑक्टोबर 1955 साली स्मिता पाटील यांचा जन्म पुण्यात झाला. त्यानंतर 13 डिसेंबर 1986 साली त्यांच निधन झालं. 

80 च्या दशकात स्मिता पाटील या व्यावसायिक सिनेमे करण्यात अधिक उत्सुक होत्या. 1982 साली 'नमक हलाल' तसेच 'शक्ती' या सिनेमात त्यांनी सुप्रसिद्ध अभिनेता अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केलं आहे. या दोघांनी एकत्र काम करताना स्वतःची अशी वेगळी कॅमेराडेरी निर्माण केली. 

बिग बींनी स्मिता पाटील यांच्याबाबत एक महत्वाची गोष्ट सांगितली. स्मिता पाटील यांनी अमिताभ बच्चन यांच्याबद्दल एक अतिशय वाईट स्वप्न पडलं होतं. महत्वाचं म्हणजे या वाईट स्वप्नाचा संबंध 1983 साली प्रदर्शित झालेल्या 'कुली' सिनेमाशी आहे. 

अमिताभ बच्चन यांनी सांगितलं की, स्मिता पाटील यांना माझा 'कुली' सिनेमाच्यावेळी अपघात झाला असं वाईट स्वप्न पडलं होतं. तर झालं असं, मी कुली सिनेमाचं शुटिंग बंगळुरू येथे करत होते. तेव्हा मला रात्री 2 वाजता स्मिता पाटील यांचा फोन आला. हॉटेलच्या रिसेप्शनवरून मला स्मिता पाटील यांचा फोन असल्याचं सांगितलं आणि तो मी माझ्या रूममध्ये घेतला. स्मिता पाटील यांच्याशी मी अशा पद्धतीने एवढ्या रात्री कधीच बोललो नव्हतो. त्यामुळे माझा थोडा गोंधळ झाला होता,' असं बिग बी सांगतात. 

तेव्हा स्मिता यांनी अमिताभ बच्चन यांच्या तब्बेतीची चौकशी केली. आणि सगळं व्यवस्थीत आहे ना? असं विचारलं. तेव्हा अमिताभ यांनी 'हो, सगळं ठिक आहे.' असं सांगितल्यावर पुढे त्या म्हणाल्या की, त्यांना अमिताभ यांच्याबद्दल वाईट स्वप्न पडलं म्हणून त्यांनी एवढ्या रात्री फोन केला. आणि त्यांच्या पुढच्याच दिवशी अमिताभ बच्चन यांचा 'कुली'च्या सेटवर अपघात झाला. 'कुली'च्या सेटवर अमिताभ बच्चन यांचा जबरदस्त अपघात झाला. त्यानंतर त्यांना अनेक महिने बरे होण्यासाठी गेले. स्मिता यांना हा अपघात स्वप्नात दिसला होता. अमिताभ यांनी हा किस्सा त्यांच्या पुस्तकात देखील लिहिला आहे. हे पुस्तक स्मिता पाटील यांच्या 60 व्या वाढदिवसानिमित्त लेखिका मैथिली राव यांनी लिहिलं आहे. 

स्मिता पाटील या फक्त उत्कृष्ठ अभिनेत्रीच नव्हत्या. तर त्या उत्तम वृत्त निवेदक होत्या. तसेच त्यांना उत्तम फोटोग्राफीची जाण होती.  स्मिता पाटील यांच निधन होऊन 33 वर्षे झाली पण आजही उत्तम अभिनेत्री म्हणून त्यांच नाव घेतलं जातं. अजूनपर्यंत हिंदी किंवा मराठी सिनेसृष्टीला इतकी सुंदर अभिनेत्री भेटली नाही.