close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

...म्हणून प्रियांका- निकचं 'ऑनलाईन कनेक्शन' चर्चेत

'निक्यांका' पुन्हा वेधत आहेत लक्ष 

Updated: Sep 23, 2019, 02:23 PM IST
...म्हणून प्रियांका- निकचं 'ऑनलाईन कनेक्शन' चर्चेत

मुंबई : अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांना कायम इतरांसमोर एक आदर्श नातं ठेवलं. पती- पत्नीच्या नात्यात गरजेच्या असणाऱ्या अनेक गोष्टी निक आणि प्रियांकाच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आल्या. मग ते एकमेकांच्या क्षेत्राप्रती असणारा आदर असो किंवा मग यश संपादन केल्यानंतर साथीदाराप्रती असणारा आदर, आनंद असो. प्रियांका आणि निक म्हणजेच चाहत्यांचे आव़डते 'निक्यांका' यांची गोष्ट काही औरच. 

अशी ही सेलिब्रिटी पती- पत्नीची जोडी सध्या सोशल मीडियावर एका फोटोमुळे लक्ष वेधत आहे. प्रियांका काही दिवसांपासून भारतात आहे. परदेशातील आपली विविध कामं पूर्ण करत आणि व्यग्र वेळापत्रकातून काहीशी उसंत घेत प्रियांका मुंबईत आली आहे. मायदेशी कुटुंबासमवेत वेळ व्यतीत करणारी प्रियांका तिच्या 'द स्काय इज पिंक' या चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्येही व्यग्र असल्याचं पाहायला मिळत आहे.

मुख्य म्हणजे या साऱ्या व्यापात तिने पती निकलाही तितकाच वेळ दिला आहे. आता हे कसं....? हाच प्रश्न तुम्हाला पडला ना? तर, याचं उत्तर आहे, व्हायरल होणारा निकचा हा फोटो. ज्यामध्ये तो आणि प्रियांका फेसटाईमवर एकमेकांशी संवाद साधताना दिसत आहेत. 

एका हातात कप पकडून, त्याच हातात मोबाईल पकडणारा निक आपल्या पत्नीशी म्हणजेच, प्रियांकाशी संवाद साधताना दिसत आहे. निकचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांनी पुन्हा एकदा या जोडीविषयी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.