मुंबई : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या रायने तिच्या सौंदर्याने आणि अभिनयाचे लाखो लोकांना भुरळ पाडली आहे. ऐश्वर्या रायच्या सौंदर्याने संपूर्ण देशासह संपूर्ण जगाला वेड लावलं आहे. अभिनेत्री ऐश्वर्या रायने 1994 मध्ये मिस वर्ल्डचा किताब जिंकला होता. ज्यानंतर तिने बॉलिवू़डमध्ये एन्ट्री केली. ऐश्वर्याने अनेक हिट चित्रपट दिले. चित्रपटांसोबत ऐश्वर्या तिच्या वयक्तीक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत राहिली. तिचे अनेक अभिनेत्यासोबत नाव जोडले गेले. ज्यानंतर अखेर ऐश्वर्या बच्चन कुटुंबाची सुन झाली.
ऐश्वर्याने बॉलिवूडची बिग बी अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चनसोबत लग्न केलं, ज्यानंतर या दोघांना एक मुलगी देखील आहे.
आपल्या सर्वांना ऐश्वर्याच्या बाबतीत या सगळ्या गोष्टी तर माहित आहेत. परंतु ती मिस वर्ल्ड होण्यापूर्वी आणि अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी ती काय करायची? हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे.
तर आज आम्ही तुम्हाला यासंबंधीत एक व्हिडीओ दाखवणार आहोत.
ऐश्वर्या राय ही मिस वर्ल्ड होण्यापूर्वी मॉडलिंग करायची. ती फॅशन डिझायनरसाठी शोमध्ये रॅम्प वॉक करायची. यासंबंधीत एक जुना व्हिडीओ ऐश्वर्याच्या फॅन पेजवर शेअर केला आहे. जो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
आपल्या आवडत्या अभिनेत्रीला असे रॅम्प वॉक करताना पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटत आहे. या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या फारच सुंदर आणि कॉन्फिडंट दिसत आहे. ती वेगवेगळ्या कपड्यांमध्ये रॅम्प वॉक करताना दिसत आहे आणि सगळ्याच प्रकारच्या स्टाईलमध्ये ती फारच सुंदर दिसत आहे.