बिपाशाच्या आधी या अभिनेत्रीवर होतं जॉनचं प्रेम, पण तिने दिला होता लग्नाला नकार

जॉन अब्राहन आज बॉलिवूडमधला एक य़शस्वी अभिनेता आहे. त्याने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम करुन प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Updated: Dec 16, 2021, 10:18 PM IST
बिपाशाच्या आधी या अभिनेत्रीवर होतं जॉनचं प्रेम, पण तिने दिला होता लग्नाला नकार title=

मुंबई : जॉन अब्राहमचा 17 डिसेंबर रोजी वाढदिवस आहे. जॉन हा 49 वर्षांचा आहे. जॉन अब्राहमने प्रिया रुचलसोबत लग्न केले आहे आणि आता तो सेटल झाला आहे पण तुम्हाला माहित आहे का की जॉन अब्राहम बिपाशा बसूच्या आधी रिया सेनला डेट करत होता आणि तो तिच्याशी लग्न करू इच्छित होता. 

तो 50 वर्षांचा होत आला असला तरी त्याची फिटनेस इतकी चांगली आहे की तो 50 वर्षांचा वाटत नाही. तो त्याच्या फिटनेसकडे नेहमीच लक्ष देत असतो. 

जॉन अब्राहमने बॉलीवूडमध्ये बराच काळ संघर्ष केला आहे. त्याने पहिल्यांदा बिपाशा बसूसोबत जिस्म हा चित्रपट केला होता. त्यानंतर 2012 मध्ये त्याने विकी डोनर या चित्रपटाची निर्मिती केली होती. याशिवाय तो मद्रास कॅफे, परमाणू या चित्रपटांमध्येही दिसला आहे. बाटला हाऊस, रॉकी हँडसम चित्रपटांमध्ये दिसला आहे आणि आता तो लवकरच अटॅकमध्ये दिसणार आहे. जॉन अब्राहम नुकताच सत्यमेव जयते 2 मध्ये दिसला होता.

जॉन अब्राहमने आता प्रिया रुचलसोबत लग्न केले आहे. दोघांनी 2014 मध्ये लग्न केले होते. जॉन अब्राहम याआधी अभिनेत्री बिपाशा बसूला डेट करत होता. दोघेही 2003 पासून रिलेशनशिपमध्ये होते. पण काही कारणांमुळे जॉन आणि बिपाशा वेगळे झाले. बिपाशाने आता करण सिंगसोबत लग्न केले.

फार कमी लोकांना माहिती आहे की जॉन अब्राहमचे रिया सेनवर प्रेम होते आणि तो तिच्याशी लग्न करू इच्छित होता. मात्र, रिया सेनने जॉनची लग्नाची ऑफर मान्य केली नाही. यानंतर दोघांचे ब्रेकअप झाले. रिया सेन अनेक बंगाली चित्रपटांमध्ये दिसते. रियाने तिचा बॉयफ्रेंड शिवम तिवारीसोबत 2017 मध्ये लग्न केले. पण जॉन अब्राहम आता मोठा कलाकार बनला असून तो अॅक्शन फिल्म्समधून खूप नाव कमवत आहे.