मुंबई : गेल्या महिन्यात आर्यन खानला ड्रग्स प्रकरणी अटक केल्याने बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान आणि त्याच्या कुटुंबाला खूप त्रास झाला. मुलाला वाचवण्यासाठी शाहरुख खानने रात्रंदिवस एक करून वकिलांची फौज उभी केली. 25 दिवसांनंतर आर्यन खानला मोकळ्या हवेत श्वास घेण्याची संधी मिळाली.
शाहरुख खान आता आपल्या मुलाच्या सुरक्षेमध्ये कोणतीही कमतरता ठेवू इच्छित नाही. त्यामुळे पठाण, टायगर 3 आणि लायनच्या शूटिंगवर परतण्यापूर्वी त्याने आर्यनसाठी एक मोठे पाऊल उचलले आहे.
शाहरुख खान आर्यनबद्दल संरक्षणात्मक
शाहरुख खान आता आपल्या मुलाचे आणखीनच रक्षण करणारा वडील झाला आहे. गेल्या महिन्याभरापासून तो कोणतेही काम करत नाही. तो आपला जास्तीत जास्त वेळ मुलांसोबत घालवत असतो. त्याचवेळी, रिपोर्ट्सनुसार, या प्रकरणाचा आर्यनवर खूप वाईट परिणाम झाला आहे, तो अजूनही या आघातातून जात आहे.
शाहरुखचे कुटुंब आर्यनला हाताळण्याचा प्रयत्न करत आहे. शाहरुख खान आता नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून पुन्हा कामाला लागणार आहे. अशा परिस्थितीत त्याला आर्यनची खूप काळजी वाटत आहे.
आर्यनच्या सुरक्षेसाठी मोठं पाऊल
आर्यनच्या सुरक्षेसाठी शाहरुख खानने मोठे पाऊल उचलले आहे. त्याच्या अनुपस्थितीत त्याची काळजी घेणाऱ्या विश्वासू व्यक्तीची त्याला गरज होती. अशा परिस्थितीत त्यांने मोठा निर्णय घेतला आहे. शाहरुखने आर्यनची काळजी घेण्याची जबाबदारी त्याचा सर्वात विश्वासू बॉडीगार्ड रवी सिंगला दिली आहे. रवी सिंग त्याच्या कुटुंबासारखा आहे.
जामिनाच्या अटीनुसार आर्यनला दर आठवड्याला शुक्रवारी एनसीबीसमोर हजर राहावे लागते. अशा स्थितीत रवी सिंग त्यांच्यासोबत असतील. जामीन मिळाल्यानंतरही आर्थर रोड तुरुंगातून आर्यनला घरी आणण्यासाठी रविसिंग पोहोचला होता.