'ओले आले' चा ताजा टवटवीत ट्रेलर; ५ जानेवारी २०२४ पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात

ओले आले सिनेमातील नाना पाटेकरांचा खोडकर अंदाज प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. हा धमाल ट्रेलर सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या ट्रेलर मध्ये नाना पाटेकर, सिद्धार्थ चांदेकर आणि सायली संजीव आणि मकरंद अनासपुरे दिसत आहेत.

Updated: Dec 21, 2023, 06:16 PM IST
'ओले आले' चा ताजा टवटवीत ट्रेलर; ५ जानेवारी २०२४ पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात title=

मुंबई : आजवर मराठीत नेहमीच हटके आणि नवनवीन विषयांना हात घालणारे चित्रपट बनत आले आहेत. यासाठी मराठी चित्रपटसृष्टी प्रसिद्ध आहे. कोकोनट मोशन पिक्चर्स मराठी रसिक प्रेक्षकांसाठी एक हृदयस्पर्शी कलाकृती घेऊन येत आहेत. नुकताच त्यांच्या आगामी 'ओले आले' या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. त्यात नाना पाटेकर, सिद्धार्थ चांदेकर आणि सायली संजीव झळकत आहेत आणि ते रिव्हर राफ्टिंगचा आनंद घेताना दिसत आहेत. या चित्रपटात मकरंद अनासपुरे हे देखील महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत. रश्मिन मजीठिया निर्मित, या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक विपुल मेहता यांनी केलं आहे. या टीझरला अवघ्या काही वेळातचं १० लाखांहून व्हूज आले होते. आता या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

हा धमाल ट्रेलर सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या ट्रेलर मध्ये नाना पाटेकर, सिद्धार्थ चांदेकर आणि सायली संजीव आणि मकरंद अनासपुरे दिसत आहेत. ओले आले' चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध संगीतकार जोडी सचिन-जिगर मराठीत पदार्पण करत आहेत. हा चित्रपट नवीन वर्षी पहिल्या आठवड्यात ५ जानेवारी २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

नुकताच सिद्धार्थ चांदेकर आणि सायली संजीव यांचा 'झिम्मा २' रिलीज झाला. या सिनेमात सिद्धार्थ चांदेकर आणि सायली संजीव झळकले आहेत. झिम्मा सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. याचबरोबर 'झिम्मा २' ही प्रेक्षकांची मने जिंकत आहे. नाना पाटेकरांचा हा अंदाज पाहून प्रेक्षक मात्र खुश झाले आहेत. ओले आले सिनेमातील नाना पाटेकरांचा खोडकर अंदाज प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. झिम्मा २ ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. सायली आणि सिद्धार्थ हे या सिनेमात रोमान्स करताना दिसणार आहेत. तर नाना सिद्धार्थच्या वडिलांच्या भूमिकेत दिसत आहेत. तगडी स्टारकास्ट असलेल्या या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

'एक अशा प्रवासाची गोष्ट, ज्याने शिकवले जीवन जगण्याचे सूत्र!' अशी टॅगलाईन असलेल्या या सिनेमाच्या माध्यमातून अभिनेते नाना पाटेकर आपल्या भेटीला येणार आहेत. संपूर्ण परिवारासाठी निखळ मनोरंजन हा या चित्रपटाचा गाभा असून नानांसोबत मकरंद अनासपुरे, सायली संजीव आणि सिद्धार्थ चांदेकर या कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी आपल्याला या सिनेमात पाहायला मिळेल.