गॅंगस्टर होते अजय देवगनचे वडील! वयाच्या 13 व्या वर्षी सोडलं होतं घर; अभिनेत्याचाच खुलासा

Ajay Devgn father : अजय देवगणनं करण जोहरच्या 'कॉफी विथ करण'च्या 8 व्या सीझनमध्ये असे अनेक खुलासे केले आहेत. 

दिक्षा पाटील | Updated: Dec 21, 2023, 05:39 PM IST
गॅंगस्टर होते अजय देवगनचे वडील! वयाच्या 13 व्या वर्षी सोडलं होतं घर; अभिनेत्याचाच खुलासा title=
(Photo Credit : Social Media)

Ajay Devgn father : बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचं नाव दिग्गज कलाकारांमध्ये घेण्यात येतं. ज्यानं 100 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांनं आजवर कितीही काम केलं असलं तरी देखील त्याचं संपूर्ण श्रेय तो त्याचे वडील वीरु देवगण यांना देतो. नुकतीच अजय देवगणनं 'कॉफी विथ करण' च्या 8 व्या सीजनमध्ये हजेरी लावली होती. यावेळी करण जोहरशी बोलताना त्याचे वडील एक साधारण व्यक्ती ते लोकप्रिय दिग्दर्शक आणि अॅक्शन कोरिओग्राफर होण्यापर्यंतचा प्रवास सांगितला आहे. अजयनं हे देखील सांगितलं की त्याचे वडील हे गॅन्गस्टर होते. 

कॉफी विथ करणमध्ये अजय देवगणला करणनं विचारलं की त्याला असं वाटतं की त्याचे वडील वीरू देवगण यांना त्यांचे ड्यूज मिळायला हवे. त्यावर अजय देवगण म्हणाला की 'खरंच'. त्यानंतर तो म्हणाला की कशा प्रकारे त्याचे वडील कमी वयात घरातून पळून गेले होते आणि त्यावेळी मोठ्या अॅक्शन डायरेक्टर्स पैकी एक ठरले होते. याविषयी डिटेलमध्ये सांगत अजय देवगण म्हणाला की जेव्हा त्याचे वडील हे 13 वर्षांचे होते तेव्हा ते त्यांचं घर सोडून जुन्या पंजाबमध्ये पळून गेले होते. त्यानंतर ते विना तिकीट मुंबईला पळून गेले आणि त्यांना तुरुंगवास देखील भोगावा लागला होता. त्याशिवाय त्यांच्याकडे कोणतही काम नव्हतं. त्यामुळे त्यांना पोटभरून काही खायला मिळेल यासाठी देखील ते सक्षम नव्हतं. मात्र, कशा प्रकारे, एका व्यक्तीनं त्यांची मदत केली आणि त्यांना म्हटलं की त्यांना त्यांची कॅब दररोज धुवावी लागेल. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अजयनं खुलासा केला की त्यानं तिथून सुरुवात केली आणि मग पुढे त्यांच्या आयुष्यात ते सरकत गेले. पुढे याविषयी बोलाताना तो म्हणाला की ते कोळीवाडा एरियाचे गॅन्गस्टरपैकी एक झाले होते. ते सुतार देखील होते आणि गॅंगस्टर सुद्धा. एक दिवस खूप मोठे अॅक्शन दिग्दर्शक रवि खन्ना हे तिथून जात होते आणि त्यावेळी रस्त्यावर भांडण सुरु होतं. त्यांनी गाडी थांबवली आणि भांडण संपल्यानंतर माझ्या वडिलांना बोलावलं आणि विचारलं की तुम्ही काय करता? तेव्हा माझे वडील म्हणाले की मी सुतार आहे. तेव्हा त्यांनी एक वाक्य म्हटलं की तू मस्त फाईट करतोस, उद्या येऊन मला भेट. तिथूनच त्यांनी सुरुवात केली होती. 

हेही वाचा : पंजाबच्या 'या' गावावर आधारीत आहे शाहरुख खानचा 'डंकी' चित्रपट!

वीरु देवगन यांनी आजवर 200 पेक्षा जास्त बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ज्यात 'रोटी कपडा और मकान', 'मिस्टर नटवरलाल', 'फूल और कांटे', 'राम तेरी गंगा मैली' असे चित्रपट आहेत. फक्त वडिलचं नाही तर अजयची आई वीणा देखील चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय निर्मात्या आहेत.