...म्हणून भारतीला बसली नवऱ्याकडून कानशीलात

सर्वांना हसायला लावणाऱ्या भारतीची व्यथा

Updated: Oct 5, 2019, 08:28 AM IST
...म्हणून भारतीला बसली नवऱ्याकडून कानशीलात  title=

मुंबई : कॉमेडी क्वीन भारती सिंगचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पती हर्ष लिम्बाच्याने तिच्या कानशीलात लगावताना दिसत आहे. खुद्द भारतीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटच्या माध्यमातून हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ २ लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

@haarshlimbachiyaa30 yaar tune tho Sachi maar Diya #funnyvedio#madhusbindiatiktok

 

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये भारती तिच्या पतिला त्रास देताना दिसत आहे. त्यामुळे तिला वैताकून त्याने पत्नीच्या कानशीलात लगावली आहे. ज्यानंतर भारती रडायला लागते. सोशल मीडियावर भारतीचा हा व्हिडिओ भलताच व्हायरल होत आहे. तिच्या या व्हिडिओला चाहते चांगल्याच प्रतिक्रिया देत आहेत.

हा व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये तिने 'यार तू तर खरचं मारलंस' असं लिहिल आहे. भारती आणि हर्षचा हा टिकटॉक व्हिडिओ आहे. ज्यामध्ये दोघे ही मस्ती करताना दिसत आहेत. पण कॅप्शनमध्ये भारती असं भासवतं आहे की हर्षने तिला खरंच चापट मारली. 

सध्या भारती तिच्या दोन शोमध्ये कमालीची व्यस्त आहे. कपिलच्या शोमध्ये वेगवेगळ्या रूपात प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. तर दुसरीकडे ती खतरो के खिलाडीमध्ये देखील भूमिका साकारत आहे. ती नेहमीची तिच्या विनोदांनी चाहत्यांना हासण्यास भाग पाडते.