नवी दिल्ली : भोजपुरी सिनेमातील अभिनेत्री मनीषा रायचा रस्ता अपघातात मृत्यू झालाय. आपल्या सिनेमाच्या शूटींगसाठी जात असताना तिच्यावर हा जीवघेणा प्रसंग ओढावलाय. ती ४५ वर्षांची होती. 'कोहबर' नाव्याच्या शॉर्टफिल्मसाठी ती ओळखली जाते. मनीषा राय भोजपुरी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध चेहरा होती.
मनीषा रायच्या मृत्यूमुळे भोजपुरी सिने इंडस्ट्रीला धक्का बसलाय. ही घटना उत्तर प्रदेशच्या बलिया जिल्ह्यामध्ये झाली. जिथे मनीषा आपल्या सिनेमाच्या शूटींगसाठी कार घेऊन चालली होती. पण रस्त्यात ट्रॅफिक असल्याने ती बाईक घेऊन सेटवर पोहोचण्यासाठी निघाली. दरम्यान एका कारने बाईकला जोरदार ठोकर दिली. या अपघातात तिचा सहाकीर संजीव मिश्र गंभीर जखमी झालाय. या अपघातानंतर ठोकर मारणाऱ्या कारचा ड्रायव्हर घटनास्थळावरून फरार झालाय. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.