BIG B Amitabh : अमिताभ बच्चन यांना कोरोना, मुंबई महापालिकेचे मोठे पाऊल

Amitabh Bachchan Covid positive : बिग बी अभिनेता कोविड पॉझिटिव्ह आल्यानंतर अमिताभ बच्चन यांचे मुंबईतील घर मुंबई महापालिकेने निर्जंतुक केले.  

Updated: Aug 25, 2022, 12:45 PM IST
BIG B Amitabh : अमिताभ बच्चन यांना कोरोना, मुंबई महापालिकेचे मोठे पाऊल title=

मुंबई : Amitabh Bachchan Covid positive : बिग बी अभिनेता कोविड पॉझिटिव्ह आल्यानंतर अमिताभ बच्चन यांचे मुंबईतील घर मुंबई महापालिकेने निर्जंतुक केले. अमिताभ बच्चन यांची मंगळवारी 23 ऑगस्ट रोजी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यानंतर पालिकेने हे पाऊल उचललं.

बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) 24 ऑगस्ट रोजी अमिताभ बच्चन यांचे घर निर्जंतुक केले. बिग बींनी अमिताभ सोशल मीडियावर सर्वांना त्यांना कोविड-19 झाल्याची माहिती दिली होती. त्यानंतर ट्विट करत त्यांच्या संपर्कातील आलेल्या लोकांनी काळजी घ्यावी आणि कोरोना चाचणी करुन घ्यावे, असे आवाहन केले आहे.

अमिताभ यांना सध्या अंगदुखी आणि डोकेदुखीचा त्रास होत आहे आणि लक्षणे गंभीर नाहीत. या अभिनेत्याला सात दिवस क्वारंटाईन करावे लागणार आहे.

मुंबई महापालिकेच्या टीमने अमिताभ बच्चन यांच्या मुंबईतील घराचे निर्जंतुकीकरण केले. बीएमसी टीमने काल सकाळी अमिताभ बच्चन यांच्या मुंबईतील घराची स्वच्छता केली.  

अमिताभ बच्चन यांची दुसऱ्यांदा कोविड-19 चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तत्पूर्वी, त्यांना जुलै 2020 मध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झाला. त्यांना नानावटी रुग्णालयात हलवण्यात आले होते. जेथे ते दोन आठवड्यांहून अधिक काळ राहिले. त्यावेळी त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन याचीही कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली होती.