...तरीही बिग बी मात्र गप्प

महानगरपालिका जुहू येथील बिग बी अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याबाहेरील ४५ फूट रस्त्याचे ६० फूट रस्त्यात रुंदणीकरण करणार आहे. 

Updated: May 2, 2019, 11:14 PM IST
...तरीही बिग बी मात्र गप्प title=

मुंबई : महानगरपालिका जुहू येथील बिग बी अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याबाहेरील ४५ फूट रस्त्याचे ६० फूट रस्त्यात रुंदणीकरण करणार आहे. या कामासाठी बिग बी व त्यांच्या शेजारी असलेली भिंत पालिका पाडू इच्छिते. नुकतेच अमिताभ यांच्या शेजारी असलेले व्यापारी के.वी.सत्यमुर्ती यांनी आपल्या जागेतील भाग देण्यास मनाई केली. मात्र, महानगरपालिके कडून कारवाई करण्यात आली आहे. अद्याप यावर अमिताभ यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

जेष्ट अभिनेते अमिताभ बच्चन लवकरच एका चित्रपटाच्या माध्यमातून रूपेरी पडद्यावर झळकणार आहेत. अयान मुखर्जी दिग्दर्शित आगामी चित्रपट 'ब्रम्हास्त्र' मध्ये ते आपली भूमिका साकारणार आहेत. याशिवाय अमिताभ बच्चन अभिनेता अक्षय कुमारसह 'लक्ष्मी बॉम्ब' चित्रपटात एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.