अभिनेता सलमान खानसाठी मोठा धक्का, जवळच्या व्यक्तीचं निधन

सलमान खानच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी

Updated: Jan 19, 2022, 08:52 PM IST
अभिनेता सलमान खानसाठी मोठा धक्का, जवळच्या व्यक्तीचं निधन title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेता सलमान खानचा हिट अँड रन खटला लढणारे वकील श्रीकांत शिवडे यांचं आज 19 जानेवारी 2022 रोजी निधन झालं आहे. वकील श्रीकांत शिवदे हे प्रदीर्घ काळापासून ब्लड कॅन्सरशी झुंज देत होते. वकील श्रीकांत यांचं वयाच्या ६७ व्या वर्षी निधन झालं. श्रीकांत शिवदे यांनी सलमान खानच्या केससोबतच अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची केसही लढवली.

श्रीकांत शिवदे यांनी अनेक हायप्रोफाईल खटले लढवले आहेत. सलमान खानच्या हिट अँड रन केसशिवाय वकील श्रीकांत शिवदे यांनी शायनी आहुजा, 2 जी स्पेकट्रमची केसही लढवली. 20 वर्षांपूर्वी सलमान खानवर हिट अँड रनचा आरोप लावण्यात आला होता.

हा खटला बराच काळ चालला, नंतर अभिनेत्याला कोर्टातून क्लीन चिट मिळाली. त्याचवेळी, शायनी आहुजाची केस 2009 मध्ये वकील श्रीकांत यांनी लढवली होती. श्रीकांत शिवदे यांनी हिरे व्यापारी भरत शहा यांची केसही लढवली. श्रीकांत शिवडे यांनी सैफ अली खान, तब्बू, सोनाली बेंद्रे आणि नीलम यांच्याविरुद्ध काळवीट शिकारीची केसही लढवली.

श्रीकांत शिवदे यांनी इंडियन लॉ सोसायटीमधून वकिलीचं शिक्षण घेतलं. श्रीकांत यांच्या पश्चात आई, पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. वकील शिवदे हे दीर्घकाळापासून ब्लड कॅन्सरने त्रस्त होते. नुकतंच त्याचं बोन मॅरो ट्रान्सप्लांटही झालं होतं. श्रीकांत शिवडे यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.