Bigg Boss 15 फेम ईशान आणि मायशा यांचा 'तो' व्हिडीओ व्हायरल, लोक म्हणाले, 'हा तर...'

आता पुन्हा एका व्हिडीओमुळे ही जोडी चर्चेत आली आहे.

Updated: Dec 9, 2021, 08:06 PM IST
Bigg Boss 15 फेम ईशान आणि मायशा यांचा 'तो' व्हिडीओ व्हायरल, लोक म्हणाले, 'हा तर...'

मुंबई : ईशान सहगल आणि मायशा अय्यर, लोकप्रिय आणि सर्वात वादग्रस्त रिअॅलिटी शो, बिग बॉसच्या 15 व्या सीझनमधील ही जोडी घरातून बाहेर पडली आहे. घरातून बाहेर पडल्यानंतरही ही जोडी एकत्र राहत आहेत. ही जोडी बिग बॉसच्या घराच्या आत असतानाही चर्चेचा विषय होती, तर आता घराबाहेर पडल्यानंतर या जोडीवरती सर्वांची नजर आहे. ही जोडी सोशल मीडियावरती सक्रिय आहे आणि ते आपल्या चाहत्यांसाठी काही ना काही कंटेन्ट अपलोड करत असतात.

आता पुन्हा एका व्हिडीओमुळे ही जोडी चर्चेत आली आहे. हा व्हिडीओ मायशा आणि ईशानच्या रोमॅन्टीक व्हिडीओ आहे. जो सोशल मीडीयावर खूप व्हायरल होत आहे.

मायशा आणि ईशानचा हा इंटिमेट व्हिडीओ इंटरनेटवर समोर आल्यानंतर चर्चेचा विषय बनला आहे. एकीकडे यावर काही लोक यांच्या जोडीवर प्रेमाचा वर्षाव करत आहे. तर काही युजर्स यावर अश्लील कमेंट करत आहेत.

सोशल मीडियावर एक वर्ग त्यांची वाईट प्रकारे खिल्ली उडवत त्यांना ट्रोल करत आहे. केवळ हेडलाइन्समध्ये राहण्यासाठी केलेली ही नौटंकी असल्याचं लोक म्हणत आहेत. ईशान सहगल आणि मायशा अय्यर यांनी आधीच मीडियावर त्यांच्या नात्याची उघडपणे पुष्टी केली असली तरी काही लोकांना त्यांचे नाते पचवणे कठीण जात आहे.

हा व्हिडीओ खूपच हॉट आणि इंटिमेट सिनचा आहे, ज्यामध्ये ईशानने काळ्या रंगाचा सूट घातलेला आहे, तर त्याची गर्लफ्रेंड, माईशाने हॉट रेड कलरचा डीप नेक गाऊन घातला आहे. या व्हिडीओत हे जोडपी कधी एकमेकांना किस्स करत आहेत, तर कधी एकमेकांच्या अगदी जवळ येत आहेत. तर कधी एकमेकांना मिठी मारत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काही युजर्सनी ईशानला 'गे' म्हटले आहे, तर काहींचे म्हणणे आहे की त्याच्या या कृतीमुळे त्याला बिग बॉस 15 मधून बाहेर काढलं आहे. मात्र, लोकं काहीही बोलू देत या जोडप्याला त्याचं काही फरक पडत नाही. या दोघांनी बिग बॉस 15 मधून बाहेर आल्यानंतर एका मुलाखतीत स्पष्ट केले होते की, ते एकमेकांसाठी खूप गंभीर आहेत.