नॅशनल टीव्हीवर राखी सावंतला कोणी केलं किस, एकच खळबळ

'वीकेंड का वार' भागात, सलमान खान शोच्या स्पर्धकांना भेटतो 

Updated: Jan 23, 2022, 08:02 PM IST
नॅशनल टीव्हीवर राखी सावंतला कोणी केलं किस, एकच खळबळ title=

मुंबई : बिग बॉस 15 च्या 'वीकेंड का वार' भागात, सलमान खान शोच्या स्पर्धकांना भेटतो आणि त्या सर्वांसोबत खूप मजा करतो. या एपिसोडमध्ये छोट्या आणि मोठ्या पडद्यावरील अनेक स्टार्सही पाहुणे म्हणून येणार आहेत. या सर्व स्टार्सनी सलमान खान आणि बिग बॉसच्या घरात उपस्थित स्पर्धकांसोबत खूप धमाल-मस्तीही केली आहे.

यावेळी बिग बॉस 15 च्या वीकेंड का वार एपिसोडमध्ये प्रसिद्ध पंजाबी गायक मिका सिंग आला आहे. दुसरीकडे, बिग बॉसच्या मंचावर मिका सिंगला पाहून राखी सावंतला धक्का बसला आहे. वीकेंड का वार एपिसोडशी संबंधित व्हिडिओ प्रोमोही समोर आला आहे. या व्हिडिओ प्रोमोच्या सुरुवातीला सलमान खान मिका सिंगसोबत त्याच्या गाण्यांवर डान्स करताना दिसत आहे.

त्याचवेळी तो मिका सिंगसोबत ढोल वाजवतानाही दिसत आहे. शोमध्ये मिका सिंगला पाहून राखी सावंतला धक्का बसल्याचं व्हिडिओ प्रोमोमध्ये दाखवण्यात आलं आहे. त्याचवेळी सलमान खान तिच्यासोबत गंमतीने म्हणतो, 'राखी तुझा फेवरेट आला आहे.' हे ऐकून मिका सिंग हसू लागतो आणि त्याला पाहून राखी सावंत म्हणाली, 'ओह माय गॉड.' त्यानंतर सलमान खान राखी सावंतला विचारतो, 'आज तुझा वाढदिवस तर नाही ना?'

हे ऐकून राखी हसायला लागते आणि मिका सिंग म्हणतो, 'तो माझा वाढदिवस होता.' तेव्हा सलमान खान हसायला लागतो आणि म्हणतो बर्थडे किस तर होवून जाऊ दे, यानंतर मिका सिंग राखी सावंतला फ्लाइंग किस देतो. दुसरीकडे, राखी सावंत सलमान खानला विचारते, 'याचा पुढचा वाढदिवस कधी आहे? मला जाणून घ्यायचं आहे.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

बिग बॉस 15 शी संबंधित हा व्हिडिओ प्रोमो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 2006 मध्ये मिका सिंगने राखी सावंतला तिच्या वाढदिवसाच्या पार्टीत तिच्या संमतीशिवाय किस केलं होतं. यानंतर दोघांमध्ये बराच वेळ वाद झाला. मिका सिंगला कायदेशीर कारवाईलाही सामोरं जावं लागलं होतं. मात्र, आता राखी सावंत आणि मिका सिंग यांच्यात कोणताही वाद नाही.