Munawar Faruqui : लोकप्रिय स्टॅन्डअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी सध्या बिग बॉस 17 मध्ये आहे. त्यामुळे तो सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. या शोमध्ये तो एक चांगला स्पर्धक म्हणून दिसत आहे. फक्त त्याचा गेम प्लॅन नाही तर त्यासोबत त्याची इतर स्पर्धकांसोबतची मैत्री देखील प्रेक्षकांना प्रचंड आवडते. मुनव्वरसमोर अंकिताना सुशांत सिंह राजपूतविषयी अनेक गोष्टींचे खुलासे केले. आता मुनव्वरनं घरच्यांसमोर काही खुलासे केले आहेत. त्यात सगळ्यांना धक्का या गोष्टीनं बसला की मुनव्वरच्या आईचे निधन हे अकालीन नव्हते तर त्यांनी आत्महत्या केली होती. त्यातही जेव्हा त्याच्या आईनं हा निर्णय घेतला तेव्हा तो फक्त 13 वर्षांचा होता.
मुनव्वर फारुकीनं त्याच्या आयुष्यातील सगळ्यात भयानक गोष्ट स्पर्धक रिंकू धवन, ऐश्वर्या शर्मा आणि नीलफ भट्टला सांगितली. त्यानं त्याच्या आईच्या आत्महत्येचं कारण देखील सांगितलं. त्याच्या आईनं आत्महत्या करण्याचा निर्णय हा फक्त वैवाहिक आयुष्यातील दु:ख आणि तिच्यावर असलेलं कर्ज आहे. मुनव्वरनं म्हटलं की वैवाहिक आयुष्यात त्या आनंदी नव्हत्या. त्यासोबत त्यांच्यावर कर्ज होतं. वडिलांनी खूप कर्ज घेतलं होतं. आईनं देखील कर्ज घेतलं होतं. त्यावेळी अपमानास्पद परिस्थिती होती.
मुनव्वर फारुकीनं पुढे याविषयी सांगितली की '2007 ची ही गोष्ट आहे. जानेवारी महिन्यात माझी आजी मला उठवायला आली की तुझ्या आईला काही झालय. आम्ही आईला घेऊन रुग्णालयात गेलो. डॉक्टर तिला इमरजेंसी रुममधून बाहेर घेऊन येत होते. मी जेव्हा आईला पाहिलं तेव्हा मी तिच्याकडे गेलो आणि तिचा हाथ धरला. माझ्या घरचे काही बोलत नव्हते. कोणीच काही सांगितलं नाही माझ्या आईसोबत काय झालं आहे. थोड्यावेळानं मला कळलं की आईनं विष पिलं होतं. माझ्या घरच्यांनी सांगितलं की जर बाहेरच्यांना कळलं तर खूप वाईट होईल. मी मग ही गोष्ट माझ्या मावशीच्या मुलीला सांगितली. ती नर्स होती. जेव्हा तिला कळलं की आईनं अॅसिड प्यायलं, तेव्हा तिनं तिच्यावर उपचार सुरु केले. काही काळानंतर डॉक्टरांनी काहीही होऊ शकतं नाही असे सांगितलं.'
मुनव्वर फारुकीनं पुढे म्हणाला, त्याच्या कुटुंबानं घेतलेल्या कर्जामुळे त्याला शाळा सोडावी लागली आणि काम कराव लागलं. त्यावेळी सांगत त्यानं म्हटलं की कर्ज फक्त 3500 हजारांचं आहे. त्यावेळी 3500 हजारांचं कर्ज खूप जास्त होतं. त्यांनी सांगितलं की त्यावेळी त्यांची परिस्थिती ही चांगली नव्हती. त्यामुळे तेव्हा तो चपाती आणि तिखट डाळ खायचा.
हेही वाचा : 'शेवटी बायकोच असते ती...'; रश्मिकाला मिठी मारताना आलियानं दिलेले एक्सप्रेशन पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
मुनव्वर फारुकीनं म्हटलं की, 'म्हणजे ते दुपारचं जेवण असायचं. तर रात्रीच्या जेवणात भाजी-भात असायचं. रोज जेवायला हेच बनायचं त्याशिवाय तिसरा कोणता पदार्थ बनायचा नाही. मुनव्वरची ही गोष्ट ऐकल्यानंतर ऐश्वर्या शर्मा, नील भट्ट आणि रिंकू धवन काही वेळ शांत होतात आणि भावूक होतात.