VIDEO : राणी मुखर्जीनं न सांगताच शाहरुखनं केली तिची मदत; कृती पाहून चाहते म्हणाले, 'हाच खरा किंग'

Shah Rukh Khan and Rani Mukerji : शाहरुख खाननं कार्यक्रमात अचानक राणी मुखर्जीची तिला न कळत अशी केली मदत. व्हिडीओ पाहून चाहत्यांनी केली किंग खानची स्तुती.

दिक्षा पाटील | Updated: Oct 16, 2023, 02:33 PM IST
VIDEO : राणी मुखर्जीनं न सांगताच शाहरुखनं केली तिची मदत; कृती पाहून चाहते म्हणाले, 'हाच खरा किंग' title=
(Photo Credit : Social Media)

Shah Rukh Khan and Rani Mukerji : बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहर हा त्याच्या वेगवेगळ्या चित्रपटांसाठी ओळखला जातो. त्याचे अनेक चित्रपट आहेत ज्यांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे. त्यापैकी एक म्हणजे 'कुछ कुछ होता है'. याच चित्रपटातून करण जोहरनं दिग्दर्शक म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटाला नुकतेच 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्याच्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुंबईत असलेल्या या कार्यक्रमात करण जोहर, चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसलेला शाहरुख खान आणि रानी मुखर्जी यांनी हजेरी लावली होती. शाहरुखनं केलेल्या एका कृत्यानं सगळ्यांचे मन जिंकले आहे. त्यात कार्यक्रमातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी शाहरुख खानची स्तुती केली आहे. 

शाहरुखचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर मानव मंगलानी यानं शेअर केला आहे. शाहरुख खान या व्हायरल व्हिडीओत एका थिएटरमध्ये स्क्रीनच्या स्टेवर दिसत आहे. त्याला पाहून चाहत्यांनी जो आनंद झाला त्यामुळे हा व्हिडीओ चर्चेत नाही. तर त्याचे कारण शाहरुखनं केलेली एक कृती आहे जी त्याच्या चाहत्यानं पाहिलेली नाही तर ती फक्त कॅमेऱ्यात कैद झाली आहे. शाहरूख आणि रानी जेव्हा त्या स्क्रीनसमोर येत होते. तेव्हा पुढे चालत असलेल्या राणीच्या साडीचा पधर शाहरुखनं धरला होता. त्यानंतर जेव्हा ते दोघं स्टेजवर पोहोचले तेव्हा त्यानं तो पधर प्रेमानं स्टेजवर सोडला. त्याच्या या कृत्यानं सगळ्यांची मने जिंकली आहेत. शाहरुखनं राणीच्या साडीचा पधर का धरला होता. तर त्याचे कारण असे आहे की तिच्या साडीचा पधर हा खूप मोठा होता. त्यात कोणीही किंवा स्वत: शाहरुखही चुकून पाय ठेवू शकणार होता. त्यामुळे राणी धडपडू शकली असती किंवा मग तिची साडी फाटली असती. तर असं काही होऊ नये यासाठी त्यानं हे केलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

शाहरुखचा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांना आली रणबीर कपूरची आठवण

शाहरुखनं असं काही करण्याची ही पहिली वेळ नाही तर याआधी देखील त्यानं अशी अनेकदा त्याच्यासोबत असणाऱ्या महिला को स्टार्ट्सची मदत केली आहे. इतकंच नाही तर अनेकदा शाहरुख त्याची पत्नी गौरी खानचा पधर सांभाळताना दिसला आहे. तरी देखील प्रत्येकवेळी शाहरुख हा चाहत्याचे मन जिंकतो. शाहरुखचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी आली रणबीर कपूरची आठवण. शाहरुखच्या या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी रणबीर कपूरची आठवण काढली आहे. कारण त्याचा देखील एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओत रणबीर कपूर हा त्याची पत्नी आलिया भट्टच्या लेहेंग्याची ओढणी पायानं ढकलताना दिसला होता. 

हेही वाचा : बाथ टॉवेलमध्ये फाईट करणारी कतरिना, हवेत उडणारा 'भाई' अन् बरंच काही… Tiger 3 चा Trailer तुम्ही पाहिलात का?

'कुछ कुछ होता है' या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर या चित्रपटात शाहरुख, राणी मुखर्जी यांच्याशिवाय काजोल ही महत्त्वाच्या भूमिकेत होती. तर सलमान खानची पाहुण्या कलाकाराची भूमिका होती. काजोल आणि सलमानला या कार्यक्रमात न पाहु शकल्यानं चाहत्यांनी नाराजगी व्यक्ती केली आहे. तर ते दोघं का आले नाही काही झालं आहे का असा सवाल केला आहे. तर या चित्रपटाची पटकथा ही शाहरुख खाननंच लिहिली होती. तर त्याचे वडील यश चोप्रा यांनी धर्मा प्रोडक्शनच्या अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती केली होती. हा चित्रपट आजही लोकप्रिय आहे प्रेक्षकांनी हा चित्रपट कितीही वेळा पाहिला असला तरी त्याना पुन्हा पाहताना कंटाळ येत नाही.