आता सिनेमातून उलघडणार सानिया मिर्झाचे आयुष्य...

आजकाल बायोपिकचा जमाना आहे.

Updated: Aug 7, 2018, 08:19 AM IST
आता सिनेमातून उलघडणार सानिया मिर्झाचे आयुष्य... title=

मुंबई : आजकाल बायोपिकचा जमाना आहे. टेनिस स्टार सानिया मिर्झाच्या बायोपिकची खूप काळापासून चर्चा आहे. सुत्रांनुसार, सानिया मिर्झा बायोपिक तिच्या यशस्वी कारकीर्दीपेक्षा तिच्या आयुष्यातील वादविवादांवर अधिक भाष्य करेल.

सिनेमात हे मुद्दे होतील अधोरेखित 

टेनिस कोर्टात सानिया परिधान करत असलेले शॉर्ट स्कर्ट आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकसोबत केलेला निकाह यामुळे सानियावर टीकेची झोड उडाली होती. सानियाचे लग्न तर वादग्रस्त ठरले. पाकिस्तानी खेळाडूशी विवाह केल्याने लाखो लोकांनी तिच्यावर नाराजी व्यक्त केली. हेच मुद्दे सिनेमातत अधोरेखित केले जाणार आहेत.

कोण साकारणार सानियाची भूमिका?

निर्माते रॉनी स्क्रुवाला यांनी सानियाच्या जीवनावर सिनेमा बनवण्याचे योजले आहे. मात्र सानियाची भूमिका नक्की कोण साकारणार, हे निश्चित झालेले नाही. सानिया मात्र बायोपिकमध्ये तिची मैत्रिण परिणीती चोप्राला पाहणे, पसंत करेल.

अजूनही सानियाचे उत्तर नाही

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निर्माते सानियालाच ही भूमिका साकारण्यास सांगत आहेत. कारण सानिया जाहिरातींमध्ये काम करते आणि कॅमेऱ्याशी तशी ती चांगलीच परिचयाची आहे. निर्माते यासाठी तिला भरभक्कम मानधनही देण्यास तयार आहे. पण यावर सानियाचे कोणतेही उत्तर आलेले नाही. यापूर्वी सचिन: अ बिलियन ड्रीम्स या सचिन तेंडूलकरच्या बायोपिकमध्ये तो खुद्द झळकला होता. तर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या सनी लियोनीच्या बायोपिकमध्ये तिने स्वतः भूमिका साकारली आहे.