सलमानला आधार देण्यासाठी दोन्ही बहिणी जोधपूरला रवाना...

काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खान दोषी आढळला.

Updated: Apr 5, 2018, 12:27 PM IST
सलमानला आधार देण्यासाठी दोन्ही बहिणी जोधपूरला रवाना... title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानविरोधात चालू असलेल्या काळवीट शिकार प्रकरणाचा जोधपूर न्यायालयाने आज निर्णय दिला. त्यात सलमान खान दोषी आढळला असून त्याला 6 वर्षांची शिक्षा होऊ शकते. मात्र या स्थितीतही सलमानच्या कुटुंबाचा पाठींबा त्याला कायम असल्याचे दिसून येते. सलमानला पाठींबा देण्यासाटी त्याच्या दोन्हीही बहिणी अलविरा खान आणि अर्पिता खान शर्मा जोधपूरला रवाना झाल्या. इतकंच नाही तर चक्क अभिनेत्री कतरिना कैफही सलमानच्या बचावासाठी प्रार्थना करण्यासाठी सिद्धिविनायक मंदिरात पोहचली.

हे कलाकारही दोषी

या प्रकरणात सलमानसोबत सैफ अली खान, अभिनेत्री तब्बू, नीलम आणि सोनाली बेंद्रे हे कलाकारही आरोपी होते. या प्रकरणाच्या निर्णयासाठी सगळे सेलिब्रेटी जोधपूरला पोहचले होते. 

बहिणींशी घट्ट नाते

सलमानच्या दोन्हीही बहिणींशी त्याचे फार घट्ट नाते आहे. अनेकदा त्यांच्या जबरदस्त बॉडिंगची प्रचिती आपल्याला सोशल मीडियावरील फोटोज आणि व्हिडिओज वरुन येते. या कठीण काळात सलमानला आधार देण्यासाठी दोघीही बहिणी जोधपूरला रवाना झाल्या आहेत.

काय आहे हे प्रकरण?

सलमान खान, सैफ अली खान, तब्बू, नीलम, सोनाली बंद्रे यांनी हम साथ साथ है या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान काळवीटाची शिकार केल्याचे आरोप यांच्यावर होते. अनेक वर्षांपासून जोधपूर न्यायालयात चालू असलेल्या या प्रकरणाचा आज निकाल लागला.