दिसला की उडवा...; Vicky- Katrina च्या लग्नात कोणाला संपवण्याच्या ऑर्डर?

 का घ्यावा लागला हा निर्णय? 

Updated: Dec 3, 2021, 01:10 PM IST
दिसला की	 उडवा...; Vicky- Katrina च्या लग्नात कोणाला संपवण्याच्या ऑर्डर?
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : कतरिना कैफ आणि विकी कौशल अखेर विवाहबंधनात अडकत आहेत. बऱ्याच चर्चांनंतर त्यांच्या लग्नाची तारीख समोर आली. 9 डिसेंबरला काही खास पाहुण्यांच्या उपस्थितीत ही जोडी एका नव्या प्रवासाची सुरुवात करणार आहे. (Katrina kaif Vicky kaushal)

विकी, कतरिनाच्या लग्नाची बातमी ऐकून चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. सेलिब्रिटी मित्रांमध्येही या कारणामुळं आनंद पाहायला मिळाला. 

काहींनी मात्र या लग्नाबाबत नाराजी व्यक्त केली. कारण होतं अटींची लांबलचक यादी. 

या लग्नसोहळ्यामध्ये पाहुण्यांनाही सेल्फी किंवा कोणातही फोटोसुद्धा काढण्याची परवानगी नसेल. इतकंच काय, तर आता आणखी एक अट समोर येत आहे. 

असं म्हटलं जातंय की, विविहस्थळी किंवा त्यानजीकच्या परिसरात कुठेडी ड्रोन उडताना दिसल्यास तो मारून संपवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. 

लग्नाशी संबंधित कोणताही फोटो लीक होऊ नये यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार विकी आणि कतरिनानं पाहुण्यांकडून 'नो फोटो एनडीए' क्लॉजवर सही करुन घेतली आहे. सुरक्षेच्या बाबतीतही विकी आणि कतरिनानं काही महत्त्वाचे निर्णय घेत तशा अनुषंगानं व्यवस्था केली आहे. 

दरम्यान, विकी आणि कतरिनाच्या लग्नाची तयारी आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. 7 तारखेपासून लग्नसमारंभांना सुरुवात होणार आहे. ही जोडी 6 डिसेंबरला जयपूरमध्ये पोहोचणार आहे. जिथून त्यांना थेट विवाहस्थळी नेण्यात येईल.