प्रियकराच्या आठवणीत आमिरच्या लेकीने असं काही लिहिलं की...

कलाविश्वात पदार्पणासाठी ती सज्ज आहे.  

Updated: Aug 23, 2019, 12:44 PM IST
प्रियकराच्या आठवणीत आमिरच्या लेकीने असं काही लिहिलं की...
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

मुंबई : बॉलिवूडमध्ये आपल्या कारकिर्दीच्या आणि वेगळेपणाच्या बळावर अभिनेता आमिर खान याने त्याचं स्थान प्रस्थापित केलं. 'परफेक्शनिस्ट' म्हणून ओळखल्या जाणाऱ्य़ा या अभिनेत्याची मुलगीही त्याच्या पावलावर पाऊल ठेवत कलाविश्वाच्याच वाटेवर निघाली आहे. पण, आमिरची लेक म्हणजेच इरा ही अभिनयात नव्हे, तर थेट दिग्दर्शनाच्या क्षेत्रात करिअर करु पाहत आहे. 

इराच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन याविषयीची बरीच माहिती मिळत आहे. एका निर्मिती संस्थेच्या साथीने इरा ही रंगभूमीवरुन तिच्या दिग्दर्शन कौशल्यावर अधिकाधिक काम करण्याला प्राधान्य देत आहे. या वर्षाच्या अखेरीस, ग्रीक ट्रेजेडीवर आधारित तिच्या एका नाटकाला भारतातील काही ठराविक शहरांमध्ये दाखवलं जाणार आहे. लवकरच या नाटकाच्या प्रिमिअयरविषयीची माहितीही समोर येणार असल्याचं इराच्या निकटवर्तीयांकडून कळत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

मुंबईतून या नाटकाच्या तालमीला सुरुवात होणार आहे. आपल्या याच कारकिर्दीविषयी ती म्हणाली, 'रंगभूमीपासून करिअरची सुरुवात करण्यात काही वेगळं नाही. कारण मुळातच माझा या गोष्टीकडे फार आधीपासून कल होता . हे सारंकाही वास्तविक आणि भौतिक आहे.'

एकिकडे इका तिच्या परफेक्ट पदार्पणाच्या तयारीत व्यग्र असतानाच दुसरीकडे तिच्या सोशल मीडिया पोस्ट कायमच चर्चेचा विषय ठरतात. आपल्या खासगी आयुष्याविषयी कायम खुलेपणाने बोलणारी आणि व्यक्त होणारी इरा ही सध्या तिच्या प्रियकराच्या अनुपस्थितीमुळे हिरमुसलेली दिसत आहे. मिशाल कृपलानी या तिच्या प्रियकरासोबच्या फोटोवरील कॅप्शन पाहता हे लक्षात येत आहे. 'सारं काही ठीक होईल....' असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे. सोबत काही हॅशटॅगही जोडले आहेत. पण, हे हॅशटॅग पाहता इरा आणि मिशानच्या नात्यात नेमकं काय सुरु आहे याची मात्र उकल होत नाही.