'तिला' पाहून अभय देओलची अशी झाली अवस्था; नेटकरी विचारतात, ही कोण सुंदरा?

ही आहे तरी कोण? 

Updated: Sep 27, 2021, 01:06 PM IST
'तिला' पाहून अभय देओलची अशी झाली अवस्था; नेटकरी विचारतात, ही कोण सुंदरा?
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्यांची नाती कधी आणि कुठे आकारास येतील याचा काहीच नेम नाही. याचीच प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. पण, अद्यापही याची खातरजमा मात्र झालेली नाही. सध्या सोशल मीडियावर एका बॉलिवूड अभिनेत्याची सोशल मीडिया पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. निमित्त ठरत आहे ते म्हणजे या अभिनेत्याची एकीशी झालेली जवळीक. 

हा अभिनेता आहे, अभय देओल (Abhay Deol ). त्यानं नुकतंच शिलो शिव सुलेमान (Shilo Shiv Suleman) हिच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. त्याचे तिच्यासोबतचे फोटो आणि त्यांच्यामध्ये असणारी जवळीक खूप काही सांगून जात आहे. त्याची ही पोस्ट पाहता हे दोघं एकमेकांना डेट तर करत नाही ना, असाच प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. 

या दोघांचेही बोल्ड फोटो सोशल मीडियावर चांगलेच लक्ष वेधत आहेत. 'फ्ल्यूड, फ्री, फ्लोइंग, सूदिंग, फ़न, फियरलेस, सेंशुअल, संतुष्ट करणारी, प्रेरणादायक, डायनॅमिक, टॅलंटेड, सेक्सी, ओह.... आणि @shiloshivsuleman मध्ये या साऱ्याच गोष्टी आहेत.' असं कॅप्शन अभयनं या फोटोंना दिलं आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Abhay Deol (@abhaydeol)

दरम्यान, ही सुंदरा कोण आहे याचा थांगपत्ता लागल्यानंतर नेटकऱ्यांनी तिच्या सोशल मीडिया अकाऊंटकडे धाव मारली. जिथं तिच्या असंख्य बोल्ड अदा पाहायला मिळाल्या. यापूर्वी 2020 मध्येही अभय देओल सेलिब्रिटी मॅनेजर आणि आर्टिस्ट सायरिना मामिक हिच्याशी जवळीक साधत असल्याच्या चर्चा होत्या.