स्वत:च्याच मुलांविषयी अजय देवगणचं मोठं वक्तव्य

सेलिब्रिटीचं खासगी आयुष्य म्हणजे..... 

Updated: Sep 16, 2019, 09:12 AM IST
स्वत:च्याच मुलांविषयी अजय देवगणचं मोठं वक्तव्य  title=
स्वत:च्याच मुलांविषयी अजय देवगणचं मोठं वक्तव्य

मुंबई : बॉलिवूड विश्वात सेलिब्रिटींच्या खासगी जीवनाविषयी जाणून घेण्यासाठी चाहत्यांमध्ये भलतीच उत्सुकता पाहायला मिळते. आपल्या आवडीच्या किंवा इतर कोणत्याही सेलिब्रिटीचं खासगी आयुष्य म्हणजे चाहत्यांमध्ये चर्चेसाठीचा आवडीचा विषय. गेल्या काही काळापासून चर्चांच्या याच वर्तुळात वाव मिळत आहे तो म्हणजे सेलिब्रिटींच्या मुलांना.

चित्रपट जगतात एक नवी पिढी उभी राहत असतानाच त्यांच्याविषयी जाणून घेण्यासाठी काहींनी सोशल मीडियाची मदत घेतली. तर, काहींनी माध्यमांमध्ये येणाऱ्या या सेलिब्रिटी किड्सकडून मिळणाऱ्या माहितीचा आधार घेतला. याच सेलिब्रिटी किड्सच्या गर्दीत अभिनेत्री काजोल आणि अभिनेता अजय देवगण यांच्या मुलांचाही समावेश आहे. 

अजय आणि काजोलची मुलं म्हणजेच न्यासा आणि युग हेसुद्धा आजकाल प्रसिद्धीझोतात येत आहेत. पण, अजयला मात्र ही बाब सतावत आहे. नुकतंच एका मुलाखतीत अजयने ही बाब स्पष्ट केली. न्यासा आणि युग यांचं वारंवार प्रकाशझोतात राहणं तुम्हाला चिंता देऊन जातं का? प्रश्न अजयला विचारण्यात आला होता. यावर त्याने आपली भूमिका मांडली. 

आपल्या मुलांचं माध्यमांमध्ये चर्चेत असणं, वारंवार प्रकाशझोतात असणं या गोष्टी मला सहाजिकत चिंतेत टाकून जातात. पण, मला असं वाटतं की माझी मुलं ही समजुतदार आहेत आणि त्यांनी आपल्या पालकांकडून काही सकारात्मक गोष्टी मिळतात, तर काही नकारात्मक गोष्टीही मिळतील यांची समज त्यांना आहे', असं तो म्हणाला. 

अजय देवगन पत्नी काजोल और बच्चों संग रोड ट्रिप पर रवाना, शेयर की ये PHOTO

भविष्याविषयी फारसा विचार न करता आपण वर्तमानात राहण्यालाच अजयने कायम प्राधान्य दिलं आहे. शिवाय एक सेलिब्रिटी म्हणून आपल्या वाट्याला येण्याची फिकीर नसल्याचंही तो म्हणाला. प्रसिद्धीझोतापासून स्वत:ला कसं दूर ठेवतोस?, असा प्रश्न विचारला असता, 'मी या साऱ्याचा विचार करत नाही. मला याची फिकीरही नाही. किंबहुना मी बाहेर कमीच जातो. मी स्वत:चं शक्तीप्रदर्शनही करत नाही. मला असं वाटतं की आम्हा दोघांना (काजोल आणि मला) याची काहीच परवा नाही. आम्ही आपआपल्या स्थानी आनंदात आहोत', असं तो म्हणाला. एकंदरच एक सेलिब्रिटी म्हणून जगण्यासोबतच अजय आणि त्याचं कुटुंब सर्वसामान्य व्यक्तीच्या आयुष्यालाच जास्त प्राधान्य देतात हे स्पष्ट होत आहे.