Allu Arjun Arrest: हैदराबादमधील संध्या चित्रपटगृहात 'पुष्पा 2' चित्रपटाच्या स्क्रिनिंगदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 35 वर्षीय महिला रेवती यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी अभिनेता अल्लू अर्जूनसह (Allu Arjun)अनेकांना जबाबदार धरण्यात आलं. दरम्यान याप्रकरणी चिक्कडपल्ली पोलिसांनी आज सकाळी अभिनेत्याला अटक केली आहे. अटक केल्यानंतर पोलीस स्थानकात नेऊन चौकशी करण्यात आली आणि कोर्टात हजर करण्यात आलं असता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. यादरम्यान मृत महिलेचा पती भास्कर याने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे.
'मला साधा ब्रेकफास्ट करु दिला नाही, बेडरुममधून नेलं अन्...'; अटकेनंतर अल्लू अर्जून पहिल्यांदाच बोलला
भास्कर यांनी सांगितलं आहे की, "मला अल्लू अर्जून यांच्या अटकेबद्दल काही माहिती नव्हतं. माझं या प्रकरणाशी काही देणं घेणं नाही. माझ्या पत्नीचा मृत्यू तिथे झालेल्या चेंगराचेंगरीमुळे झाला आहे. मला पोलिसांनी अटकेबद्दल कोणतीही माहिती दिली नाही". भास्कर यांच्या या विधानामुळे प्रकरणाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे. इतकंच नाही तर त्यांनी तक्रार मागे घेण्याची तयारी सुरु केली आहे.
అల్లు అర్జున్ ను అరెస్టు చేసిన విషయం టీవీ లో చూసి తెలుసుకున్న అవసరం అయితే కేసును ఉపసుహరించుకుంటా
The police havent informed to revathi husband . Looks like some political target and display of power #AlluArjunArrest #AlluArjun
— AAkash(@CultAAkash) December 13, 2024
अल्लू अर्जुनला चेंगराचेंगरी प्रकरणी अटक झाल्यानंतर काही तासांनंतर, जिथे त्याच्या 'पुष्पा 2: द रुल' या चित्रपटाचा प्रीमियर आयोजित करण्यात आला होता, तेव्हा सिनेमा हॉलच्या व्यवस्थापनाने लिहिलेले पत्र समोर आलं आहे. यामुळे पोलिसांच्या दाव्यावर प्रश्चचिन्ह उपस्थित होत आहे. हैदराबाद पोलिसांनी सांगितलं होतं की, अभिनेत्याच्या टीमने किंवा संध्या 70 एमएम थिएटरच्या व्यवस्थापनाने त्यांना कोणीही येत असल्याची माहिती दिली नव्हती. अल्लू अर्जून अचानक आल्यामुळे गर्दी वाढली, ज्यामुळे चेंगराचेंगरी झाली असा पोलिसांचा आरोप आहे.
संध्या थिएटरच्या व्यवस्थापनाने 2 डिसेंबर रोजी पोलिसांना लिहिलेल्या पत्रात स्पष्टपणे नमूद केलं होतं की, अल्लू अर्जुन, रश्मिका आणि त्याच्या चित्रपटातील सहकलाकार प्रीमियरला उपस्थित राहतील आणि पुरेशी सुरक्षा व्यवस्था ठेवण्याची विनंती केली आहे.
हैदराबादमधील चिक्कडपल्ली पोलिस स्टेशनच्या सहाय्यक पोलिस आयुक्तांना संबोधित केलेल्या पत्रात संध्या थिएटरच्या लेटरहेडवर लिहिले आहे की 'पुष्पा 2' चा प्रीमियर 4 डिसेंबर रोजी होणार आहे आणि मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहतील अशी अपेक्षा होती. अभिनेत्याच्या वकिलाने शुक्रवारी न्यायालयात सांगितले की, या पत्रावर सहायक पोलिस आयुक्तांनी स्वाक्षरी केली आहे आणि त्याची पावती आहे.
"पुष्पा 2 च्या रिलीजच्या संदर्भात 04-12-2024 रोजी SANDHYA 70 MM RTC X Roads, हैदराबाद येथे पोलीस बंदोबस्त (व्यवस्था) देण्याची आम्ही तुम्हाला विनंती करतो. कारण तिथे चाहत्यांची मोठी गर्दी असेल. नायक, नायिका. आणि चित्रपटाचे व्हीआयपी आणि प्रॉडक्शन युनिट चित्रपट पाहण्यासाठी येत आहेत,” असं पत्रात म्हटलं आहे. या पत्राची प्रत हैदराबाद वाहतूक पोलिसांनाही पाठवण्यात आली होती.