मनोज बाजपेयी याचा प्रवास संघर्षपूर्ण होता. बिहारमधील एका साध्या कुटुंबात जन्मलेल्या मनोज यानी अभिनेता होण्याचे स्वप्न पाहिले, मात्र दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये तीनदा नाकारला गेला. त्यानी थिएटरमध्ये काम करत अभिनयाचा सराव सुरू ठेवला त्यानंतर त्याला मुंबईत काम शोधण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. आर्थिक अडचणींमुळे त्यानी छोट्या नोकऱ्या केल्या, परंतु जिद्द कायम ठेवली. या अभिनेत्याला खरी ओळख मिळाली ती म्हणजे 'सत्या' चित्रपटातील 'भीकू म्हात्रे'च्या भूमिकेमुळे. कठोर मेहनतीने त्यानी स्वतःला सिद्ध केले आणि आज तो भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक मानले जातात, ज्याची कहाणी चिकाटी आणि धैर्याचा आदर्श आहे.
एका मुलाखतीत मनोज बाजपेयी यांनी सांगितले की, त्यांचे वडील नवीन विचारांचे होते आणि त्यांच्या लग्नाला त्यांनी सहज स्वीकारले. मनोज म्हणाला, 'माझे वडील अत्यंत उदारमतवादी होते. त्यांचे अनेक मुस्लिम मित्र होते, आणि त्यांच्या मृत्यूच्या वेळी आमच्या कुटुंबाला आश्चर्य वाटले की हिंदूंपेक्षा अधिक मुस्लिम मित्र उपस्थित होते.'
मनोज बाजपेयी यांनी त्यांच्या मुलीबद्दलही एक किस्सा शेअर केला. ते म्हणाले, 'माझ्या मुलीने एकदा विचारले की, तिचा धर्म काय आहे. तेव्हा माझ्या पत्नीने तिला सांगितले की ती स्वतः ठरवू शकते की तिला कोणता धर्म पाळायचा आहे. आम्ही तिला कधीही कोणत्याही धर्माचे बंधन घालून दिले नाही.'
धर्मावरून कोणतीही अडचण किंवा भांडण कधीच झाले नसल्याचेही त्यांनी सांगितले. मनोज पुढे म्हणाला, 'मी माझ्या घरात दररोज पूजा करतो, तर माझी पत्नी तिच्या धर्माच्या परंपरा पाळते. आमच्या कुटुंबात सर्वांना आपापल्या श्रद्धेनुसार राहण्याची पूर्ण मुभा आहे.'
तो म्हणाला, 'धर्माच्या मुद्द्यावर आमच्या घरी कधीही वाद होत नाहीत. आम्ही एकमेकांच्या श्रद्धांचा आदर करतो. माझ्या मुलीलाही आम्ही सांगतो की, धर्म निवडण्याचा निर्णय पूर्णपणे तिचा आहे. आम्ही तिच्यावर कोणतीही बंधने घालणार नाही.'
हे ही वाचा: https://zeenews.india.com/marathi/entertainment/why-did-rani-mukherjee-s...
मनोज बाजपेयी यानी शेवटी सांगितले की, 'धर्म हा खाजगी विषय आहे. आपण एकमेकांचा आदर करणे महत्त्वाचे आहे. घरात शांतता हवी असेल, तर धर्मावरून वाद करण्याऐवजी सहिष्णुतेने एकत्र राहणे अधिक चांगले.'
मनोज बाजपेयी यांचा हा दृष्टीकोन अनेकांसाठी प्रेरणादायक ठरतो, विशेषत: आजच्या काळात, जेव्हा धर्मावरून अनेक अडचणी निर्माण होतात.