मुंबई : हिंदी कलाविश्वात अमूक एका दिग्दर्शकासोबत काम करण्ययाची संधी मिळावी असं प्रत्येक कलाकाराला वाटत असतं. काहींची ही स्वप्न साकार होतात, तर काहींना मात्र यासाठी प्रतीक्षा करावी लागते. जुन्या आणि प्रसिद्ध दिग्दर्शकांचा अनुभव आणि कलाविश्वातील त्यांचं स्थान पाहता त्याच्यासोबत काम करण्याची नवोदितांची इच्छा असण्यात वावगं काहीच नाही. पण, खिलाडी कुमारचं मात्र दिग्दर्शकांच्या या समीकरणावर एक वेगळं मत आहे. गुड न्यूज या आगामी चित्रपटानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात त्याने याविषयीचं लक्षवेधी वक्तव्य केलं.
अक्षयने आतापर्यंत बऱ्याचदा नव्या जोमाच्य दिग्दर्शकांसोबत काम केलं आहे. याचविषयी सांगताना तो म्हणला, 'मी नव्या दिग्दर्शकांसोबत काम करतो, कारण मोठे दिग्दर्श मला (त्यांच्या चित्रपटासाठी) निवडत नाहीत. ज्यावेळी असं होतं तेव्हा तुम्हालाच स्वत:चा प्रवास सुरुव करावा लागतो. एखाद्या मोठ्या ठिकाणी काम मिळालं नाही, की तुम्ही छोट्या ठिकाणची वाट धरता. पात्रता असूनही, माझी निव़ड अनुक एका मोठ्या, प्रथियश ठिकाणी का होत नाही याचा विचार करत तुम्ही बसून राहत नाही', असं त्याने सांगितलं.
मोठे दिग्दर्शक फक्त खान अभिनेत्यांशीच काम करण्यात उत्सुक होते, असा एक काळ होता ज्याविषयीसुद्धा अक्षयने त्याचं मत मांडलं. 'ते (मोठे, प्रथितयश) दिग्दर्शक त्यांच्याकडेच गेले जे त्या भूमिकांसाठी पात्र होते. फक्त खानच नव्हे तर, कपूर आणि इतर अभिनेतेही होतेच त्यात. मी त्याकरता पात्र नाही, असं समजून घेतलं आणि त्यानंतर मी माझ्या पद्धतीने गोष्टी मिळवल्या', असं अक्षय म्हणाला.
काही दिग्दर्शक असे आहेत ज्यांनी खिलाडी कुमारच्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. पण, त्याच्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलेलं नाही. याविषयी तेथे उपस्थित असणाऱ्या करण जोहरलाही तुम्ही विचारावं असं तो कार्यक्रमादरम्यान म्हणाला.
'नव्या दिग्दर्शकांसोबत काम करण्याच्या अनुभवाविषयी सांगताना अक्षय कुमारने सद्यस्थितीसुद्धा सर्वांपुढे ठेवली. नवोदित कलाकार नवं आणि चांगलं काम करण्याची इच्छा बाळगून असतात. त्यांच्यासाठी चित्रपट हा करो या मरोची परिस्थिती असते. कारण चित्रपट चालला नाही, तर कारकिर्द धोक्यात येण्याचा त्यांचा समज असतो', ही अतिशय महत्त्वाची बाब त्याने सर्वांपुढे ठेवली. दिग्दर्शक नवा असो किंवा जुना, मोठा... यामध्ये खिलाडी कुमार हा प्रत्येकाला त्यांच्या कामाचं श्रेय देण्यास मात्र विसरत नाही हेसुद्धा तितकंच खरं.