Akshay Kumar Statement : वॉर्नर ब्रदर्सचा कार्टून शो 'टॉम अँड जेरी' याने लहानपणी प्रत्येकाच्या मनात घर केलंय. लहान मुलांपासून ते म्हातारे-कोतारे देखील घरात कार्टुन लावून बसायचे. टॉम आणि जेरी यांच्यातील भांडणं पाहून लहान मुलांचं आयुष्य खळखळून निघायचं. तर मोठ्यांच्या कामाचा ताण देखील शिण व्हायचा. मात्र, हा शो थांबला अन् लोकांच्या हिरमोड झाला. परंतु बरेच लोक अजूनही यूट्यूबवर त्याच्या छोट्या क्लिप शोधून हे कार्टून पाहतात. अनेकांचं बालपण जे कार्टुन पाहुन सुखात गेलं, त्यावर आता अभिनेता अक्षय कुमार याने मोठं वक्तव्य केलंय.
'टॉम अँड जेरी' कॉर्टुनमध्ये लोकांना कॉमेडी दिसली असेल, पण या कार्टून फ्रँचायझीमध्ये हिंसा दाखवण्यात आली आहे, असं वक्तव्य अक्षय कुमारने केलं आहे. अक्षय कुमारच्या आगामी 'खेल-खेल में' या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान त्याने हे वक्तव्य केलं. 'खेल-खेल में' या सिनेमाच्या प्रमोशनसाठी फरदीन खान आणि अक्षय कुमार यांनी एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी फरदीन खानने सांगितलं की, मला टॉम अँड जेरी कार्टुन आवडतं. ज्या पद्धतीनं त्यात कॉमेडी दाखवली जातं ते मला आवडतं, असं फरदीन खानने म्हटलं. त्यावेळी अक्षयने फरदीन खानला रोखलं अन् आपलं मत मांडलं.
टॉम अँड जेरी ही कॉमेडी नाही, तर ॲक्शन आहे आणि त्यात हिंसा आहे, असं अक्षय कुमार म्हणतो. मी तुम्हाला एक गुपित सांगतो... मी केलेले अनेक ॲक्शन सीन्स टॉम अँड जेरीमधून घेतले आहेत. हेलिकॉप्टरचा तो संपूर्ण सीन मी टॉम अँड जेरीकडून घेतला होता, असा खुलासा देखील अक्षय कुमारने यावेळी केला आहे. टॉम अँड जेरीमधील ॲक्शन प्रकार अविश्वसनीय असल्याचं देखील अक्षय कुमारने यावेळी म्हटलं आहे.
दरम्यान, 'खेल-खेल में' चित्रपटात अभिनेत्याशिवाय वाणी कपूर, तापसी पन्नू, एमी विर्क, प्रज्ञा जैस्वाल आणि आदित्य सील हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. भूषण कुमार, कृष्ण कुमार, अश्विन वर्दे, विपुल डी. शाह, राजेश बहल, शशिकांत सिन्हा आणि अजय राय हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. दिग्दर्शन मुदस्सर अझीझ यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रपट येत्या 15 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.