बिग बींच्या मुलीच्या वैवाहिक नात्यात वादळ? का आई-वडिलांसोबतच राहते श्वेता नंदा ?

असं म्हटलं जातं की ...

Updated: Dec 22, 2021, 02:44 PM IST
बिग बींच्या मुलीच्या वैवाहिक नात्यात वादळ? का आई-वडिलांसोबतच राहते श्वेता नंदा ?  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : महानायक आणि बॉलिवूड स्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे त्यांच्या मुलीवर किती प्रेम करतात हे काही वेगळं सांगण्याची गरजच नाही. विविध कार्यक्रम असो किंवा मग सोशल मीडिया. श्वेता बच्चन नंदा आणि बिग बी यांच्या नात्यांची घट्ट वीण कायमच आपल्यासमोर आली आहे. 

श्वेताला कायमच आपल्या वडिलांची काळजी लागून राहिलेली असते. किंबहुना असं म्हटलं जातं की गेल्या काही दिवसांपासून ती वडिलांच्या म्हणजेच बच्चन यांच्याच घरी राहत आहे. 

23 वर्षांपूर्वी अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या मुलीचा विवाह एस्कॉर्ट्स ग्रुपचे सध्याचे कार्यकारी संचालक निखील नंदा यांच्याशी केलं. 

त्यावेळी काहींना वाटलं की, श्वेता मुंबई सोडून दिल्लीला राहायला जाईल. कारण तिचा पतीही दिल्लीतच स्थायिक आहे. 

मुळात तसं झालं नाही. दोन्ही मुलांच्या जन्मानंतर श्वेता मुंबईतच वडिलांच्या 'जलसा' या निवासस्थानी राहू लागली. 

श्वेताच्या या निर्णय़ानंतर अनेक चर्चांनी जोर धरला. सासरच्यांशी वाद होण्यापासून ते अगदी पतीपासून दुरावा असेपर्यंत अनेक फाटे या चर्चांना फुटले. 

मुळात कारण असं की, श्वेता सध्या तिच्या मुलांच्या करिअरवरच लक्ष देऊ इच्छिते. ज्यामुळं ती त्यांच्यासोबतच राहण्याला प्राधान्य देत आहे.

वैवाहिक आणि कौटुंबीक आयुष्याबाबत सांगावं तर, श्वेताच्या खासगी आयुष्यात सर्वकाही सुरळीत सुरु असल्याचं अदजी स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. 

श्वेता आणि तिचा पती हे दोघंही दोन वेगळ्या क्षेत्रांत कार्यरत आहेत. त्यामुळं त्यांना अनेकदा एकत्र पाहिलं जात नाही.