Planet Parade Video : आकाशात एका रांगेत पाच ग्रह पाहून अमिताभ बच्चनही भारावले, त्या क्षणाची दृश्य व्हायरल

Planet Parade Video : सूर्यास्तानंतर निरभ्र आकाशात पाहिलं की, दरवेळी आपण भारावतो. निसर्गाची ही किमया पाहताना आपण त्यापुढे किती लहानगे आहोत याचीच अनुभूती होते. असाच प्रसंग नुकताच संपूर्ण जगानं अनुभवला.   

Updated: Mar 29, 2023, 07:17 AM IST
Planet Parade Video : आकाशात एका रांगेत पाच ग्रह पाहून अमिताभ बच्चनही भारावले, त्या क्षणाची दृश्य व्हायरल
Bollywood Actor Amitabh bachchan shares a video of planet parade 2023

Planet Parade Video : आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्या पृथ्वीचा इतर ग्रहांशी असणारा संबंध आणि अवकाशात सुरु असणाऱ्या हालचाली या सर्वच गोष्टी आपल्याला भारावणाऱ्या असतात. अशाच एका भारावणाऱ्या घटनेनं मंगळवारी सर्वांनाच अवाक् केलं. कारण निरभ्र आकाशात सूर्यास्तानंतर मंगळवारी सायंकाळी पाच ग्रह एका रांगेत आल्याचं पाहायला मिळालं. खगोलशास्त्रज्ञांनी ग्रहांच्या या रचनेला Planet Parade असं नाव दिसं होतं. इथं लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे ही रचना कोणत्याही दुर्बिणीशिवाय पाहता येणार होती. अनेकांनीच हे अद्वितीय दृश्य पाहिलं. अगदी कलाकार मंडळीही यात मागे राहिली नाहीत. (Bollywood Actor Amitabh bachchan shares a video of planet parade 2023 ) 

बॉलिवूडचे महानायक, बिग बी अमिताभ बच्चन हेसुद्धा या क्षणांचे साक्षीदार झाले आणि नेहमीप्रमाणं आपण अनुभवलेले हे क्षण त्यांनी फॉलोअर्स आणि चाहत्यांच्याही भेटीला आणले. सोशल मीडियावर बिग बींनी एक व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ होता Planet Parade चा. 

शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये ग्रह अगदी स्पष्टपणे दिसत असून, तो लगेचच अनेकांनी रिशेअर आणि रिपोस्टही केला. ज्या मंडळींना काही कारणास्तव ग्रहांची ही रचना पाहणं शक्य झालं नाही, त्यांनीसुद्धा हा व्हिडीओ वारंवार पाहत भारावल्याची प्रतिक्रिया दिली. 

सोशल मीडियावरही अनेकांनीच शेअर केले फोटो.... 

फक्त अमिताभ बच्चनच नव्हे, तर सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक नेटकऱ्यांनी ग्रहांच्या या रचनेचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले. तुम्ही हे दृश्य पाहिलं का? 

हेसुद्धा वाचा : Five Planet Alignment : अवकाशात 5 ग्रहांचं अद्भूत मिलन, 'या' राशींच्या लोकांसाठी भाग्यशाली

 

Planet Parade म्हणजे नेमकं काय घडलेलं? 

मंगळवारी सायंकाळी बुध, मंगळ, गुरू, युरेनस आणि शुक्र हे ग्रह एका रांगेत आले होते. यामध्ये मंगळ, शुक्र आणि गुरू हे ग्रह अधिक स्पष्टपणे दिसत होते. ही घटना इतकी अद्वितीय होती, की यापुढे ती थेट 2040 म्हणजेच 17 वर्षांनंतर पाहायला मिळणार आहे. त्यामुळं या प्लॅनेट परेडची इतकी चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं.