अर्जुन कपूरच्या शरीराला हे काय झालं? हा अनपेक्षित बदल अनेकांनाच धक्का देणारा

त्याची अनेकदा खिल्लीही उडवली गेली होती, पण...   

Updated: Sep 29, 2021, 10:24 AM IST
अर्जुन कपूरच्या शरीराला हे काय झालं? हा अनपेक्षित बदल अनेकांनाच धक्का देणारा  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अभिनेता अर्जुन कपूर यानं हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आणि पुढे तो अनेक चित्रपटांमध्ये झळकला. पण, तरीही त्याला अपेक्षित यश मिळालंच नाही. कारण ठरत होतं ते म्हणजे अर्जुनचं स्थूल शरीर. एका अभिनेत्याची अपेक्षित शरीरयष्टी नसल्यामुळं त्याला तुलनेनं कमीच लोकप्रियता मिळाली. पण, अर्जुनवर प्रेम करणाऱ्या चाहत्यांचाही एक वर्ग होता, ज्यानं त्याची साथ कधीच सोडली नाही. (Bollywood actor Arjun Kapoor flaunts killer abs as he showcases his dramatic physical transformation )

चाहत्यांच्या प्रेमाच्या बळावर आणि खासगी आयुष्यात घडलेल्या काही सकारात्मक बदलांमुळे अर्जुन आता त्याच्यामध्ये काही महत्त्वाचे बदल करु पाहत आहे. हे बदल इतरांना धक्का देणारे आणि थक्क करणारे ठरत आहेत. स्थूल शरीराचा सामना करणारा अर्जुन अनेकदा काही अडचणींचा सामना करत होता. पण, आता मात्र त्यानं शरीरावर ताबा परत मिळवला असून, याचीच एक झलक इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून सर्वांच्या भेटीला आणली. त्याची ही पोस्ट अर्थातच टॉक ऑफ द टाऊन ठरली. 

अर्जुननं ही पोस्ट करत त्यामध्ये अॅब्सचा उल्लेख बिस्कीट असा केला आहे. पहिल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्यानं लिहिलंय, बिस्कीट वापस आ गया है, चाय लाना जरा..., पुढच्या पोस्टमध्ये त्यानं लिहिलंय, अॅक्चुअली बिस्कीट का पुरा पॅकेट रेडी है भायलोग... तो पार्टी करे?... त्याच्याच पुढच्या पोस्टमध्ये त्यानं लिहिलं आहे, खरंतर... नो पार्टी, चला जरा आणखी मेहनत करु... #workinprogress. 

width: 640px; height: 360px;

अर्जुनच्या या पोस्ट आणि त्याला त्यानं दिलेलं कॅप्शन पाहता त्यानं घेतलेली मेहनत सर्वांच्याच समोर आली आहे. दरम्यानच्या काळात अर्जुननं त्याच्या शरीरावर बरीच मेहनत घेतली असून, यापुढंही तो अशीच मेहनत घेणं सुरुच ठेवणार आहे हे स्पष्ट होतंय.