इतक्या कमी वयातच अर्जुन रामपालची मुलगी का ठरतेय 'नॅशनल क्रश'? फोटोंवरून नजर हटेना

या सुपरहँडसम अर्जुनची लेक एकाएकी चर्चेत आली आहे. 

Updated: Jun 14, 2022, 11:30 AM IST
इतक्या कमी वयातच अर्जुन रामपालची मुलगी का ठरतेय 'नॅशनल क्रश'? फोटोंवरून नजर हटेना title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : Bollywood अभिनेता Arjun Rampal याची मुलगी Myra Rampal अचानकच सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागली आहे. पहिल्या पत्नीपासून विभक्त असूनही अर्जुन त्याच्या मुलींसोबत मात्र खास नातं शेअर करतो. दोन्ही मुलींना तो अपेक्षित वेळ देताना दिसतो. मुलींसाठी तो वडिल कमी आणि एक मित्रच जास्त आहे. 

अशा या सुपरहँडसम अर्जुनची लेक एकाएकी चर्चेत आली आहे. ती चर्चेत येण्याचं कारण म्हणजे सोशल मीडियावर व्हायरल होणारे काही फोटो. 

मायरा रामपाल (Mayra Rampal) हिच्या रुपानं घायाळ होणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे. मायराचे सोशल मीडियावर व्हायरल होणारे फोटो पाहून तिच्यामध्ये अभिनेत्री होण्याची कुवत असल्याचीच प्रतिक्रिया काही चाहत्यांनी दिली आहे. 

Arjun Rampal Daughters

माहिका आणि मायरा, अशी त्याच्या दोन्ही मुलींची नावं. दोन्ही मुलींवर त्याचा विशेष जीव. अर्जुनच्या याच दोन मुलींपैकी एकीनं म्हणजेच मायरानं नेटकऱ्यांना अशा लेखी प्रभावित केलं, की तिचा उल्लेख सर्वजण नॅशनल क्रश असा करत आहेत. 

मायरानं शेअर केलेले फोटो पाहता, ती कोणा एका आघाडीच्या मॉडेल किंवा अभिनेत्रीहून कमी नाही असंही काहींचं म्हणणं. ती सोशल मीडियावर फारशी सक्रिय नाही. पण, यानं तिच्या फॉलोअर्सच्या आकड्यावर मात्र फरक पडलेला नाही. 

Mayra Rampal Photo Shoot

Mayra Rampal Fan Following

Mayra Rampal Bollywood Debut

मायरानं आतापर्यंत तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून बरेच फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये तिचा बोल्ड लूक पाहायला मिळत आहे. दरम्यान, एकिकडे मायराच्या रुपानं सर्वजण घायाळ झालेले असतानाच दुसरीकडे तिच्या बॉलिवूड पदार्पणाची मात्र कोणतीही चर्चा किंवा तशी चिन्हं नाहीत.